राजाभाऊ शिंदे हे उटवद या गावचे रहिवासी. त्यांच्याकडे पाच ते सहा एकर वडिलोपार्जित शेती आहे. परंतु शेतीसाठी पाण्याची कमतरता आहे. त्यामुळे कपाशी उपटून नवीन दुसरं कोणतं पीक घ्यावया शोधात होते. कांदा पिकासाठी पाण्याची आवश्यकता जास्त असते. तर गहू पिकाला ही पारंपारिक पद्धतीने पाच ते सहा पाणी द्यावे लागतात. परंतु टोकण पद्धतीने एक किलो गव्हाला एक कट्टा उत्पन्न मिळतं असं ते ऐकून होते. प्रयोग म्हणून त्यांनी आपल्या एक एकर क्षेत्रावर 20 किलो गहू टोकण पद्धतीने लागवड केला. टोकण पद्धतीने लागवड केलेल्या गव्हाला ठिबकची सोय केली. पाण्याच्या उपलब्धतेनुसार पाणी देण्याचे नियोजन केलं. दर पाच-सहा दिवसांनी दोन किंवा तीन तास पाणी गव्हाला देत राहिले.
advertisement
सालगडी म्हणून दुसऱ्याच्या शेतात काम, मग केली पैशांची शेती, आता 3 एकरात 10 लाखांचं उत्पन्न!
पेरणी वेळी केवळ एक बॅग 20-20 झिरो 13 खताची मात्रा दिली. तसेच गव्हावर कोणतीही फवारणी करण्याची आवश्यकता त्यांना भासली नाही. सध्या हा गहू काढणीस आला असून 20 किलो गव्हाला त्यांना 20 ते 25 कट्टे म्हणजेच 12 ते 16 क्विंटल गहू होण्याची अपेक्षा आहे. एवढ्या कमी पाण्यावर पारंपारिक पद्धतीने गहू पीक घेणे शक्यच नव्हतं. परंतु इतरांचा ऐकलेला प्रयोग स्वतः शेतात करून पाहण्याचा निर्णय घेतला. यामागे कुटुंबापुरते गहू व्हावे आणि शेतामध्ये पिकाची फेरपालट व्हावी हाच उद्देश होता, असं राजाभाऊ शिंदे यांनी सांगितलं. इतर शेतकऱ्यांनी ही वेगवेगळे प्रयोग करून आपल्या शेती उत्पन्न वाढवावं, असं आवाहन देखील ते इतर शेतकऱ्यांना करतात.





