TRENDING:

सुरुवातीला 10 हजार रु भाड्याने जमीन घेतली, एका निर्णयाने नशीब पालटलं, शेतकरी वर्षाला करतोय 2 कोटींची कमाई

Last Updated:

Farmer Success Story : केवळ बारावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या या शेतकऱ्याने पारंपरिक शेतीला छेद देत भाजीपाला लागवडीकडे वळण्याचा निर्णय घेतला आणि आज ते वर्षाला कोट्यवधींचा नफा कमावणारा यशस्वी उद्योजक शेतकरी ठरला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
success story
success story
advertisement

मुंबई : मेहनत, धाडस आणि योग्य निर्णय घेतला तर शेतीही सोनं पिकवू शकते, याचं जिवंत उदाहरण म्हणजे राजस्थानातील भरतपूर जिल्ह्यातील थेई गावचे गोविंद सिंग. केवळ बारावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या या शेतकऱ्याने पारंपरिक शेतीला छेद देत भाजीपाला लागवडीकडे वळण्याचा निर्णय घेतला आणि आज ते वर्षाला कोट्यवधींचा नफा कमावणारा यशस्वी उद्योजक शेतकरी ठरला आहे. भेंडीसारख्या साध्या भाजीने त्याने केवळ स्वतःचं नव्हे, तर संपूर्ण गावाचं भविष्य बदलून टाकलं आहे.

advertisement

2005 पासून सुरुवात

गोविंद सिंग यांचा शेतीतील प्रवास 2005 साली सुरू झाला. त्यावेळी उत्तर प्रदेशातून आलेल्या त्यांच्या मामांनी थेई गावात12 एकर जमीन भाड्याने घेतली. प्रति एकर 10 हजार रुपये भाडे देऊन त्यांनी भेंडीची लागवड केली आणि अवघ्या सहा महिन्यांत तब्बल 15 लाख रुपयांचा नफा मिळवला. हा अनुभव गोविंद सिंग यांच्या कुटुंबासाठी डोळे उघडणारा ठरला. त्यांचे वडील रणवीर सिंग यांनीही पारंपरिक गहू आणि बाजरीऐवजी भेंडीची लागवड करण्याचा निर्णय घेतला. त्यांनाही तितकाच नफा मिळाला आणि याच क्षणी गोविंद सिंग यांना शेतीत बदल घडवण्याची दिशा मिळाली.

advertisement

1 कोटींचा मिळतो नफा

पारंपरिक पिकांतून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याचं लक्षात आल्यावर गोविंद सिंग यांनी भाजीपाला लागवडीवर पूर्ण लक्ष केंद्रित केलं. सुरुवातीला थोडी जमीन, मग हळूहळू विस्तार करत आज त्यांचं कुटुंब तब्बल 250 एकर क्षेत्रावर शेती करत आहे. यामध्ये 100 एकरांवर बटाटा, 50 एकरांवर भेंडी आणि उर्वरित जमिनीवर वांगी, कोबी, सिमला मिरची आणि टोमॅटो यांसारख्या भाज्यांची लागवड केली जाते. या नियोजनबद्ध शेतीतून त्यांना दरवर्षी सुमारे 2 कोटी रुपयांचा नफा मिळतो. फक्त बटाट्यापासून 60 लाख, भेंडीपासून 55 लाख आणि इतर भाज्यांमधून जवळपास 1कोटी रुपये नफा मिळतो.

advertisement

गोविंद सिंग ताजी भाजी थेट बाजारात पोहोचवण्यावर भर देतात. भेंडी काढल्यानंतर ती जयपूर, दिल्ली, आग्रा आणि मथुरा येथील मोठ्या बाजारपेठांमध्ये पाठवली जाते. कामगारांची कमतरता ही एक मोठी अडचण असली तरी त्यांनी त्यावरही मार्ग काढला आहे. एका एकर भेंडीसाठी पाच कामगार लागतात, हे आव्हान असलं तरी मिळणाऱ्या उत्पन्नामुळे हा खर्च परवडणारा ठरतो.

advertisement

या यशातूनच गोविंद सिंग यांनी सामाजिक उपक्रमालाही सुरुवात केली. त्यांनी एक छोटी वित्त कंपनी सुरू करून गरजू शेतकऱ्यांना एक लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यास सुरुवात केली. आज या उपक्रमात 100 हून अधिक लोक सहभागी झाले आहेत. भेंडीच्या लागवडीमुळे गावातून होणारे स्थलांतर थांबले आहे आणि अनेक शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले आहेत. आज थेई गावातील सुमारे 250 शेतकरी 600 एकरांवर भेंडीची लागवड करत असून अनेक जण कोट्यधीश झाले आहेत.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
20 गुंठ्यात 4 लाख! मराठवाड्यातील शेतकऱ्याला सापडला यशाचा फॉर्म्युला, काय केलं?
सर्व पहा

मराठी बातम्या/कृषी/
सुरुवातीला 10 हजार रु भाड्याने जमीन घेतली, एका निर्णयाने नशीब पालटलं, शेतकरी वर्षाला करतोय 2 कोटींची कमाई
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल