पापरी गावातील शेतकरी रविराज भोसले यांनी 15 एकरात डाळिंबाची लागवड केली आहे. भगवा जातीचे डाळिंब 6 एकर, जैन भगवा डाळिंब 5 एकर आणि शरद किंग डाळिंब 3 एकर अशा वेगवेगळ्या तीन जातीच्या डाळिंबाची लागवड केली आहे. डाळिंबावर फळकुज, डांबऱ्या, तेल्या यांसारखे रोग पडू नये म्हणून डाळिंबावर त्यांनी इंग्लिश पेपर लावलेला आहे.
advertisement
Agriculture: कमी खर्च, शून्य मशागत तरी भरगोस पिकाची हमी! कशी केली जाते एसआरटी पध्दतीची शेती?
यामुळे डाळिंबावर रोग येत नाही आणि डाळिंब सुद्धा दिसायला चांगला दिसतो. 15 एकरात 14 बाय सहा या पद्धतीने डाळिंबाची लागवड केली आहे. जवळपास 15 एकरातून 50 टन डाळिंबाचे उत्पादन मिळणार आहे, तर या डाळिंब लागवडी एकरी 1 ते 2 लाख रुपये खर्च आला आहे.
सध्याच्या स्थितीला डाळिंबाला भाव चांगला असून मार्केटमध्ये दीडशे ते दोनशे रुपये किलो दर डाळिंबाला मिळत आहे. मार्केट मधला भाव बघता 15 एकरातून 40 ते 50 लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार असल्याची माहिती शेतकरी रविराज भोसले यांनी दिली. शेतकऱ्यांनी डाळिंबाची लागवड करून योग्य ती काळजी घेतली तर नक्कीच फायदा मिळेल, असा सल्ला डाळिंब शेतकरी रविराज भोसले यांनी दिला आहे.