TRENDING:

Success Story : पंजाबी हार्वेस्टर चालकाकडून अपमान, मनातील एक सल, जिद्दीला पेटलेल्या शतकऱ्याने खरेदी केले 35 हार्वेस्टर, Video

Last Updated:

पंजाब येथील हार्वेस्टर चालकाने अपमानित केले, म्हणून खचून न जाता जिद्दीने पेटून उठलेल्या सतीश तौर यांनी एका हार्वेस्टरपासून सुरू केलेला प्रवास तब्बल 35 हार्वेस्टरपर्यंत नेऊन पोहोचवला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
जालनाः एखादी गोष्ट जर आपल्या जिव्हारी लागली आणि ती गोष्ट आपण सकारात्मक पद्धतीने घेतली तर काय बदल घडू शकते, हे जालन्यातील सतीश तौर या सर्वसामान्य शेतकऱ्याने सिद्ध करून दाखवले आहे. पंजाब येथील हार्वेस्टर चालकाने अपमानित केले, म्हणून खचून न जाता जिद्दीने पेटून उठलेल्या सतीश तौर यांनी एका हार्वेस्टरपासून सुरू केलेला प्रवास तब्बल 35 हार्वेस्टरपर्यंत नेऊन पोहोचवला आहे. पाहुयात जालन्यातील या जिद्दी शेतकऱ्याची यशोगाथा.
advertisement

टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही अशी म्हण आपल्याकडे आहे. त्याचबरोबर अपमानाचा घोट गिळल्याशिवाय यशाचे शिखर गाठता येत नाही हे देखील तितकेच खरं. अपमानाची एक सल मनात रुतली आणि जालन्यातील सतीश तौर यांनी एकामागून एक हार्वेस्टर घेण्याचा धडाकाच लावला. तेही एका सर्वसामान्य भाजीपाला विक्री करणाऱ्या शेतकऱ्याने.

Success Story : हॉटेल बंद पडले पण हार नाही मानली, पुन्हा जोमाने सुरू केला व्यवसाय, आता महिन्याला 1 लाख कमाई

advertisement

2008-09 चा काळ. तौर कुटुंबाने त्यांच्या 15 एकर शेतीमध्ये गव्हाची लागवड केली होती. गहू काढणीसाठी त्याकाळी पंजाब राज्यातून हार्वेस्टर यायचे. गहू काढण्यासाठी सुरुवातीला असलेला 900 रुपये दर लोकांची चढाओढ आणि मागणी पाहून चालकांनी 1800 रुपयांपर्यंत वाढवला. परंतु तरीदेखील त्यांच्या 15 एकर क्षेत्रावरील गहू काढण्यासाठी हार्वेस्टर चालक त्यांच्या शेताकडे फिरकला नाही. चार ते पाच दिवस पाठलाग केल्यानंतर तौर यांनी दोन हजार रुपये त्याच्या हातावर टेकवले आणि माझ्या शेतातील गहू काढण्यासाठी चल असं म्हटलं.

advertisement

View More

तेव्हा हार्वेस्टर चालकाचा पारा चढला. तू काय माझ्या मशीनचा मालक झालाय का, असे शब्द त्याने तौर यांना वापरले. झालेला अपमान त्यांनी तसाच गिळला. पण अपमानाची सल तशीच मनात ठेवून जिद्दीने पेटून उठले. 2009 मध्ये पहिला हार्वेस्टर खरेदी केला आणि एका मागून एक हार्वेस्टरची रांगच लावली.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
युद्धाचा फटका केळी उत्पादक शेतकऱ्यांना, फक्त दीड रुपये किलोने खरेदी, कांद्याला काय मिळतोय भाव?
सर्व पहा

सोयाबीन, गहू, तूर, मका, मूग आणि उडीद आणि हरभरा अशा पिकांची हार्वेस्टरच्या माध्यमातून ते काढणी करतात. एका मशीनवर किमान तीन कामगारांची आवश्यकता असते. सर्व 35 मशीन सुरू असतील तर त्यांच्याकडे 70 ते 100 कामगार काम करतात. याच हार्वेस्टरच्या माध्यमातून आम्ही 15 एकर शेती 35 एकर वाढवली असल्याचे त्यांचा धाकटा मुलगा सयाजी तौर याने सांगितले. सतीश आणि सयाजी या पितापुत्राची ही कहाणी सर्वांसाठीच प्रेरणादायी अशीच आहे.

advertisement

मराठी बातम्या/कृषी/
Success Story : पंजाबी हार्वेस्टर चालकाकडून अपमान, मनातील एक सल, जिद्दीला पेटलेल्या शतकऱ्याने खरेदी केले 35 हार्वेस्टर, Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल