पाचनवडगाव येथील कैलास सुलताने 2006 पासून फूलशेतीच्या व्यवसायात आहेत. गुलाब, लिली, गुलछडी, मोगरा यासारखी फुले ते आपल्या शेतात घेतात. या फुलांना सण-उत्सवाच्या काळात अतिशय चांगला दर मिळतो. सोयाबीन, कापूस यासारख्या पारंपरिक पिकांच्या तुलनेत फूलशेती फायदेशीर ठरते. वर्षाकाठी एक ते सव्वा लाखांचा खर्च येत असला तरी 3 ते 4 लाखांचा निव्वळ उत्पन्न हातात येते.
advertisement
जालना शहर हाकेच्या अंतरावर असल्याने फुले विकून पुन्हा शेतातील कामे करण्यासाठी गावी येता येते. हेच पैसे शेतातील मुख्य पिकांना उपयोगी येतात आणि या माध्यमातून घरखर्च देखील चालवला जातो. जालना शहरात फूल विक्रीस घेऊन गेल्यानंतर दिवसाला दीड ते दोन हजारांपासून पाच हजार रुपयेयापर्यंत कमाई होते, असे शेतकरी कैलास सुलताने यांनी सांगितले.
माझ्याकडे गुलाब, गुलछडी, लिली आणि मोगरा अशी फुले असतात. गुलाबाला साधारणपणे 60 रुपयांपासून 100 रुपये किलो असा दर मिळतो. लिली दहा ते वीस रुपये गड्डे या पद्धतीने विक्री होते. गुलछडीला 200 ते 300 रुपये प्रति किलो असा दर मिळतो. तर मोगऱ्याला 200 ते 500 रुपये प्रति किलो असा दर मिळतो. आमच्या गावात जवळपास प्रत्येकाच्या घरी थोडीफार का होईना, फूलशेती आहे. माध्यमातून लोकांना घरखर्च चालवण्यासाठी आणि शेतीचा खर्च भागवण्यास मदत होते, असे कैलास सुलताने यांनी लोकल 18 शी बोलताना सांगितले.