आंतरपीक शेती म्हणजे काय?
कमी जागेत त्यांनी चांगल्या प्रकारे नियोजन केल्यामुळे उत्पन्न देखील त्यांना समाधानकारक मिळतंय. तसेच या कामात त्यांच्या पत्नी इंदूबाई दवंडे या ही त्यांना हातभार लावत असतात. या शेतीच्या माध्यमातून दवंडे दांपत्याला 3 लाख रुपयांचे उत्पन्न या शेतीतून मिळत असल्याचे संतोष दवंडे यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले. खिर्डी येथे 30 गुंठे शेती होती, त्यामुळे तीन वर्षांपूर्वी लिंबूनिची लागवड केली. त्यामध्ये आंतरपीक म्हणून आणि कमी शेतीतून जास्त उत्पादन घेण्यासाठी इतर पिके घेतली.
advertisement
सुरुवातीच्या काळात 2 ट्रॉली शेणखताचा वापर केला, तसेच मल्चिंगचा वापर केला. याबरोबरच पाण्यासाठी ठिबक सिंचनचे व्यवस्थापन केले. कीटकनाशकाची फवारणी देखील केली आणि क्षेत्रानुसार अंतराचे नियोजन केले. पपई पिकातून आतापर्यंत दोन ते अडीच लाख रुपयांचे मिळाले आहे, जवळपास आतापर्यंत ह्या अर्ध्याच पिकांची विक्री झालेली आहे. आणखी यामध्ये चांगले उत्पादन आणि उत्पन्न होईल. त्यामुळे आम्ही 30 गुंठे क्षेत्रामध्ये समाधानी आहोत.
इंदू दवंडे या छत्रपती संभाजीनगर, खुलताबादसह चार ठिकाणचे बाजार करतात. या शेतीतून निघणारा भाजीपाला आणि पपई स्वतः विक्री करतात. त्यामुळे ही शेती अधिक फायदेशीर ठरत असल्याचे ते देखील दवंडे दाम्पत्याने सांगितले. तरुण आणि इतर शेतकऱ्यांनी देखील आंतरपीक शेती पद्धत वापरायला हवी, विशेषतः पपई पिकासाठी शेणखत आवश्यक असते. त्यामध्ये इतर पिके देखील घेता येतात. या प्रकारची शेती करायची झाल्यास खिर्डी येथे प्रत्यक्ष येऊन शेतकरी पाहणी आणि विचारणी करू शकतात त्यामुळे माहिती मिळेल व अशा पद्धतीने शेती करायला सोपे जाईल असे देखील दवंडे यांनी म्हटले आहे.