एका पॅकेटमधून मिळालेली कल्पना
हर्षित लंडनमध्ये शिकत असताना, त्याने एकदा इस्त्रायलमधून आलेल्या ॲवोकाडो फळाचे पॅकेट पाहिले. एवढ्या लांब देशातून हे फळ यावे आणि लोक त्यासाठी मोठी किंमत द्यावीत, हे त्याला विशेष वाटले. याच विचाराने प्रेरित होऊन त्याने इस्त्रायलच्या आधुनिक शेतीत रस घेतला.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हर्षितने नोकरी स्वीकारण्याऐवजी इस्त्रायलला थेट शेती प्रशिक्षणासाठी जाण्याचा निर्णय घेतला. तिथे तो आधुनिक शेतीच्या पद्धती शिकला आणि त्या भारतात लागू करण्याचा संकल्प केला.
advertisement
1800 रोपांची लागवड केली
2019 मध्ये हर्षितने भोपाळ येथे ‘इंडो-इस्त्रायल ॲवोकाडो’ नावाने स्वतःचा शेती व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला त्याने 5 एकर जमीन घेतली आणि 1800 ॲवोकाडो रोपांची लागवड केली. आधुनिक तंत्रज्ञान, योग्य नियोजन आणि मेहनतीच्या जोरावर त्याने मोठे यश मिळवले.
अडथळ्यांवर मात करून मिळवलं मोठं यश
शेतीचा प्रवास सोपा नव्हता. कोरोना काळात त्याला इस्त्रायलमधून रोपं आयात करणे कठीण झाले. मात्र, 2021 मध्ये तो पुन्हा उभा राहिला आणि 20,000 रोपं आयात करून लागवड सुरू केली. आज त्याच्या या मेहनतीला फळं लागली असून तो लाखो रुपयांचे उत्पन्न घेत आहे.
इतर शेतकऱ्यांनाही करतोय मार्गदर्शन
हर्षित केवळ स्वतःपुरताच थांबला नाही. तर त्याने महाराष्ट्र, मध्य प्रदेश, अरुणाचल प्रदेश आणि सिक्किममधील शेतकऱ्यांना ॲवोकाडो रोपं पुरवण्यास सुरुवात केली. तो केवळ रोप विकत नाही तर शेतकऱ्यांना मोफत मार्गदर्शनही करतो.
वर्षाला 1 कोटी रुपयांची कमाई
आज हर्षित ॲवोकाडो शेतीतून आणि रोप विक्रीतून वर्षाला 1 कोटींहून अधिक कमाई करत आहे. त्याचे पुढील उद्दिष्ट म्हणजे आपली शेती मोठ्या प्रमाणावर वाढवणे आणि देशभरातील शेतकऱ्यांना आधुनिक शेतीच्या दिशेने प्रेरित करणे. हा आहे.
"केवळ मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरी करणं हेच यश नाही, तर स्वतःचं काहीतरी करून लोकांना रोजगार देणं, नवीन संधी निर्माण करणं हे खरे यश!" हे हर्षितच्या यशाने सिद्ध केले आहे.
