सिंधुदुर्ग - कोकणात मोठ्या प्रमाणावर भात शेती केली जाते. जुलैमध्ये लावलेली भात आता कापणीस तयार झाली आहे. मात्र, परतीच्या अवकाळी पावसामुळे शेतकरी हैराण झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 17 हेक्टरहुन अधिक भात शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामध्ये जिह्यातील 15 गावामध्ये 102 शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याचबाबत लोकल18 च्या टीमचा हा आढावा.
advertisement
आतापर्यंत जिल्ह्यात 17 हेक्टरहुन अधिक भात शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामध्ये पिकलेले भात पावसामुळे जमिनीवर पडल्याने भाताला अंकुर फुटण्याचे प्रमाण जास्त आहे. परतीच्या पावसाने तळकोकणातील भातशेतीचे मोठे नुकसान केले आहे. मागील 15 दिवस परतीचा पाऊस हा दुपारच्या सत्रानंतर मेघगर्जनेसह कोसळत आहे.
या पावसामुळे तळ कोकणातील भातशेती पाण्यात गेली असून शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाले आहे. मागील 15 दिवसांपेक्षा अधिक दिवस हा परतीचा पाऊस कोसळत आहे. पावसाचा जोर वाढत असून यामुळे भातपीक पडले आहे. यामुळे भात पिकाला अंकुर फुटू लागले आहेत. आधीच जुलै महिन्यात मुसळधार पावसामुळे पुरस्थिती निर्माण होवून पीक पाण्यात गेले होते.
10 वर्षातील सर्वात कठीण वेळ, सोयाबिन पिकाला कमी भाव; अमरावतीमधील शेतकऱ्यांनी व्यक्ती केली ही भीती
दरम्यान, आता परतीच्या पावसामुळे शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घासही या पावसामुळे हिरावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या परतीच्या पावसामुळे शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.