या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीचे संरक्षण करून वन्य प्राण्यांपासून आणि जनावरांपासून पिकांचे नुकसान कमी करणे हा आहे. सरकार या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 90 टक्क्यांपर्यंत अनुदान देते, ज्यामुळे शेताभोवती मजबूत काटेरी तारांचे कुंपण करता येते.
योजनेची मुख्य वैशिष्ट्ये
‘तार कुंपण अनुदान योजने’त शेतकऱ्यांना दोन क्विंटल काटेरी तार आणि सुमारे 30 लोखंडी खांबांचे साहित्य मिळते. हे साहित्य शासनाच्या 90% अनुदानावर उपलब्ध केले जाते. उर्वरित 10% खर्च शेतकऱ्यांना स्वतः करावा लागतो.
advertisement
या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या शेतात बिबट्या, जंगली डुक्कर, नीलगाय, ससा, मोर, तसेच भटक्या जनावरांमुळे होणारे नुकसान थांबते. परिणामी पिकांची उत्पादकता आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होते.
पात्रता आणि अटी काय?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी पाळणे आवश्यक आहे. शेतजमिनीवर कुठलाही कायदेशीर वाद किंवा अतिक्रमण नसावे. संबंधित शेतजमीन वन्य प्राण्यांच्या हालचालीच्या मार्गात असावी. कुंपण करताना वन्य प्राण्यांचा नैसर्गिक मार्ग बाधित होणार नाही, याची विशेष काळजी घ्यावी.
अर्ज प्रक्रिया कशी करायची?
शेतकऱ्यांनी या योजनेसाठी अर्ज पंचायत समितीच्या कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन करावा लागतो. अर्ज विहित नमुन्यात भरून ग्रामविकास अधिकारी किंवा संवर्ग विकास अधिकारी यांच्याकडे सादर करावा.
आवश्यक कागदपत्रे कोणती?
सातबारा उतारा आणि गाव नमुना 8 अ – जमिनीच्या मालकीचा पुरावा.
आधार कार्ड
जात प्रमाणपत्र – मागासवर्गीय शेतकऱ्यांसाठी (लागू असल्यास).
हक्कपत्र किंवा संमतीपत्र – जमीन एकापेक्षा जास्त मालकांच्या नावावर असल्यास.
ग्रामपंचायतीचा दाखला – स्थानिक संस्थेची शिफारस.
वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र – वन्य प्राण्यांच्या उपस्थितीबाबत.
वन समिती किंवा ग्रामस्थिती विकास समितीचे संमतीपत्र – आवश्यकतेनुसार.
दरम्यान, शेतकऱ्यांनी वेळेत अर्ज करून आणि आवश्यक कागदपत्रे सादर करून या योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी संबंधित पंचायत समिती किंवा कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.
