TRENDING:

Online शेतमाल विकताय? हा स्कॅम तुमच्यासोबतही होऊ शकतो, हे एकदा वाचाच

Last Updated:

डिजिटल युगात शेतमाल विक्रीसाठी ऑनलाइन माध्यमांचा वापर झपाट्याने वाढत आहे. बाजार समिती, दलाल यांवर अवलंबून न राहता थेट ग्राहक किंवा व्यापाऱ्यांशी संपर्क साधण्याची संधी शेतकऱ्यांना मिळत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बीड : डिजिटल युगात शेतमाल विक्रीसाठी ऑनलाइन माध्यमांचा वापर झपाट्याने वाढत आहे. बाजार समिती, दलाल यांवर अवलंबून न राहता थेट ग्राहक किंवा व्यापाऱ्यांशी संपर्क साधण्याची संधी शेतकऱ्यांना मिळत आहे. मात्र, या सुविधेसोबतच फसवणुकीचे प्रमाणही वाढत असून, अधिक दराचे आमिष दाखवून अनेक शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे ऑनलाइन शेतमाल विक्री सुरू करण्यापूर्वी योग्य माहिती आणि खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक ठरत आहे.
advertisement

ऑनलाइन विक्री करताना सर्वप्रथम विश्वासार्ह आणि अधिकृत प्लॅटफॉर्मचीच निवड करणे गरजेचे आहे. शासनमान्य ई-नाम, कृषी ई–मार्केट, FPO च्या वेबसाइट्स किंवा ओळखीच्या अ‍ॅग्री-टेक कंपन्यांचा वापर अधिक सुरक्षित मानला जातो. सोशल मीडियावरून किंवा अनोळखी व्यक्तीकडून थेट आलेल्या ऑर्डर स्वीकारताना विशेष सावधगिरी बाळगावी. कोणतीही मोठी ऑर्डर देणाऱ्या खरेदीदाराची ओळख, पूर्ण पत्ता, मोबाईल क्रमांक तसेच GST नंबर किंवा व्यवसाय नोंदणी तपासणे महत्त्वाचे आहे.

advertisement

15 वर्षांपासून काम, तरुणांना रंगमंचाशी जोडतायत गिरीश, अनोखा उपक्रम काय? Video

फसवणूक टाळण्यासाठी अ‍ॅडव्हान्स पेमेंटशिवाय शेतमाल पाठवू नये, असा सल्ला तज्ज्ञ देतात. माल मिळाल्यावर पैसे देतो किंवा बँकेतून ट्रान्सफर अडकली आहे अशा कारणांवर विश्वास ठेवल्यास नुकसान होण्याची शक्यता जास्त असते. बँक खाते, UPI व्यवहार, पावत्या व मेसेजेस यांची नोंद सुरक्षित ठेवावी. शक्य असल्यास व्यवहारासाठी करारनाम्याचा वापर करावा.

advertisement

शेतमालाची गुणवत्ता, वजन, पॅकिंग आणि दर याबाबत सर्व अटी आधीच लेखी स्वरूपात निश्चित करणे आवश्यक आहे. माल पाठवण्यापूर्वी फोटो किंवा व्हिडिओ काढून पुरावा जतन करावा. कुरिअर किंवा वाहतूक सेवेसाठी ट्रॅकिंग सुविधा असलेली विश्वसनीय सेवा निवडल्यास वाद निर्माण झाल्यास उपयोग होतो. यामुळे माल हरवणे किंवा कमी पोहोचणे यासारख्या तक्रारी टाळता येतात.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मुलांचे कपडे फक्त 150 रुपयांपासून करा खरेदी, कल्याणमधील हे ठिकाण माहितीये का?
सर्व पहा

बाजारभावाची अद्ययावत माहिती घेतल्यास अतिशय जास्त दराचे आमिष ओळखणे सोपे जाते. इतर शेतकऱ्यांचे अनुभव, स्थानिक कृषी अधिकारी, कृषी विज्ञान केंद्र किंवा शेतकरी उत्पादक कंपनी (FPO) यांच्याकडून मार्गदर्शन घेतल्यास जोखीम कमी होते. योग्य माहिती, शिस्तबद्ध व्यवहार आणि सावधगिरी पाळल्यास ऑनलाइन शेतमाल विक्री शेतकऱ्यांसाठी सुरक्षित, पारदर्शक आणि फायदेशीर ठरू शकते.

मराठी बातम्या/कृषी/
Online शेतमाल विकताय? हा स्कॅम तुमच्यासोबतही होऊ शकतो, हे एकदा वाचाच
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल