तांदळाच्या पाण्यात कोणते पोषक घटक असतात?
तांदळाच्या पाण्यात नायट्रोजन (N), फॉस्फरस (P), पोटॅशियम (K) यांसारखे आवश्यक पोषक घटक असतात, जे झाडांच्या वाढीसाठी अत्यंत गरजेचे आहेत. त्यात असलेले स्टार्च जमिनीत ओलावा टिकवून ठेवते आणि मातीतील चांगल्या सूक्ष्मजीवांना वाढण्यास मदत करते. तसेच जीवनसत्त्वे आणि खनिजे झाडांना अधिक निरोगी बनवतात. मात्र, हे पाणी वापरताना ते पातळ करणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा बुरशी किंवा जंतुसंसर्ग होऊ शकतो.
advertisement
तांदळाचे पाणी वापल्यास काय फायदे होतात?
तांदळाच्या पाण्यातील पोषक घटक झाडांना ऊर्जा देतात. तसेच त्यातील स्टार्च मातीला ओलसर ठेवते आणि कोरडेपणा कमी करते. जमिनीत ओलावा टिकून राहिल्याने वारंवार पाणी देण्याची गरज कमी होते. घरगुती तांदळाचे पाणी वापरल्याने कचरा कमी होतो आणि रासायनिक खतांवर खर्चही कमी होतो. तांदळाच्या पाण्यातील खनिजे काही कीटकांना दूर ठेवतात, त्यामुळे झाडे निरोगी राहतात.
तांदळाचे पाणी कसे वापरावे?
सर्वप्रथम तांदूळ धुतल्यावर उरलेले पाणी गोळा करा.त्यात मीठ किंवा मसाले नसावेत.
तांदळाचे पाणी आणि स्वच्छ पाणी १:२ या प्रमाणात मिसळा. १ भाग तांदळाचे पाणी आणि १० भाग स्वच्छ पाणी घ्या. हे मिश्रण थेट झाडांच्या मुळाजवळील मातीत ओता. पानांवर फवारणी करू नका.आठवड्यातून एकदा किंवा पंधरवड्यातून एकदा
वापरा. इतर वेळी सामान्य पाणी द्या.
कोणत्या चुका टाळाव्यात?
तांदळाचे पाणी हायड्रोपोनिक पद्धतीत वापरू नका, कारण त्यातील स्टार्च बुरशी आणि बॅक्टेरियाच्या वाढीस कारणीभूत ठरू शकतो. तसेच जास्त प्रमाणात वापरल्यास मातीमध्ये दुर्गंधी, बुरशी आणि पोषक तुटवडा निर्माण होऊ शकतो. आंबवलेले पाणी वापरताना ते पूर्णपणे स्वच्छ आणि ताजे असल्याची खात्री करा.
