कॉर्न टिक्की साहित्य
कॉर्न टिक्की बनवण्यासाठी लागणारं साहित्य मक्याचे दाणे 1 वाटी, उकडलेले बटाटे 4, कॉर्न फ्लोअर 2 टेबलस्पून, चाट मसाला पाव टेबलस्पून, गरम मसाला अर्धा टेबलस्पून, हिरव्या मिरच्या 3, आलं 2 इंच, लसूण 8 ते 10 पाकळ्या, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मीठ चवीनुसार लागेल.
Health Facts: भात खाल्ल्याने खरंच वजन वाढतं का? आहार तज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं
advertisement
कॉर्न टिक्की कृती
सुरुवातीला बटाटे आणि मक्याचे दाणे स्वच्छ धुवून घ्या. त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून कुकरमध्ये 6 ते 7 शिट्ट्या करून घ्या. कुकर थंड झाल्यानंतर बटाट्याच्या साली काढून त्यांना किसणीवर किसून घ्या. मक्याचे दाणे पाणी निथळून वेगळे ठेवा. एका भांड्यात किसलेले बटाटे आणि निथळलेले मक्याचे दाणे एकत्र करा.
त्यात हिरवी मिरची, आलं, लसूण आणि जीरे यांचे बारीक वाटण घालून चांगले मिसळा. त्यानंतर चाट मसाला, गरम मसाला, कॉर्न फ्लोअर, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून मिश्रण एकसारखे करून घ्या. तयार मिश्रणाचे छोटे भाग घेऊन टिक्क्या तयार करा.पॅन गरम करून त्यावर थोडे तेल पसरवा. तयार टिक्क्या पॅनवर ठेवून मध्यम आचेवर प्रत्येकी बाजूने 5 ते 6 मिनिटं सोनेरी रंग येईपर्यंत भाजा. बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ अशा या कॉर्न टिक्क्या तयार होतात.





