सोयाबीनची लागवड करून एक महिन्याच्या वर झाला आहे. तर या सोयाबीन पिकामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या किडी पिकांवर येतात. तसेच वेगवेगळ्या प्रकारचे रोग सुद्धा सोयाबीनवर पडतात. सोयाबीन पिकावर खोड पोखरणाऱ्या अळ्या, रस शोषणाऱ्या अळ्या आणि पान खाणाऱ्या अळ्या दिसून येतात. सुरुवातीच्या काळात म्हणजेच पहिल्या महिन्यात चक्रीभुंगा आणि खोडमाशीचा प्रादुर्भाव पाहायला मिळतो.
advertisement
जर बियाण्यांवर बीज प्रक्रिया केली असेल तर उत्तम, नसेल तर त्या सोयाबीन पिकावर रोग पडण्याची दाट शक्यता असते. जर सोयाबीन पिकावर रोग पडला तर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करू शकता. जर पिकांवर किड्यांपासून वाचवण्यासाठी इंटाक्झिन कार्बे, प्रोफिनोफॉस इतर कीटकनाशके सुद्धा सोयाबीनवर फवारणी करू शकता. यामुळे चक्रीभुंगा आणि खोडमाशीचा प्रादुर्भाव टाळता येतो.
सोयाबीनची लागवड केल्यावर शेतामध्ये विविध किड्यांपासून बचाव करण्यासाठी पिवळे, निळे चिकट सापळे लावणे गरजेचे आहे. तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीने सुचवलेल्या फवारण्या शेतकऱ्यांनी वेळोवेळी कराव्यात. जेणेकरून सोयाबीन पिकांवर कोणताही रोग पडणार नाही आणि आपलं सोयाबीन चांगल्या पद्धतीने येईल, त्याला बाजारात भाव देखील चांगला मिळेल, अशी माहिती डॉ. पंकज मोडावी, विशेष कृषी संरक्षण पीक, कृषी विज्ञान केंद्र, मोहोळ यांनी दिली.