Success Story: कुटुंबीय परंपरेला आधुनिकतेचा स्पर्श, सोनाली यांनी बनवला पैठणी ब्रँड, कमाई तर पाहाच
- Published by:Mohan Najan
- Reported by:Bhavna Arvind Kamble
Last Updated:
सोनाली बाणे यांनी आपल्या पारंपरिक कुटुंबीय परंपरेला नव्याने आकार देऊन एक यशस्वी ब्रँड नाविन्यास पैठणी निर्माण केला आहे.
मुंबई: दादर येथील सोनाली बाणे यांनी आपल्या पारंपरिक कुटुंबीय परंपरेला नव्याने आकार देऊन एक यशस्वी ब्रँड नाविन्यास पैठणी निर्माण केला आहे. हा ब्रँड फक्त साड्या आणि पारंपरिक कपड्यांपुरता मर्यादित नसून त्यात 80-90 प्रकारच्या पैठणीपासून बनवलेल्या विविध वस्तू देखील बनवतो. ज्यात बॅग, दुपट्टे, जॅकेट्स, क्लचेस, बॅचेस यांसारखी कस्टमाईझ्ड वस्तू देखील समाविष्ट आहेत.
सोनाली बाणे ह्या आजी-आजोबांच्या परंपरेतील पैठणी विणण्याच्या कौशल्याने प्रेरित होऊन हा ब्रँड सुरू करायला पुढे आल्या. त्यांचे आजोबा कोकणातील पैठणी विणकार होते, मात्र त्यांच्या निधनानंतर हे कार्य थांबले. पण सोनाली यांनी या कलेला सजीव ठेवत पारंपरिक पैठणीला आधुनिक डिझाईन आणि कस्टमाईझेशनच्या माध्यमातून एक नवीन वळण दिलं. आज नाविन्यास पैठणी हा एक सेलिब्रिटी ब्रँड बनला आहे.
advertisement
या ब्रँडच्या यशाचे आणखी एक कारण म्हणजे त्यांना मोठ्या सेलिब्रिटींचा पाठिंबा. अभिनेत्री माधुरी दीक्षित, विद्या बालन, सोनाली कुलकर्णी, प्रसाद ओक, सारख्या नामांकित व्यक्तींनी नाविन्यासच्या फेटा आणि शाल परिधान केल्या आहेत. या ब्रँडचे दोन आउटलेट्स असून, दादर येथील हिंदमाता येथील शॉपला ग्राहकांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे.
advertisement
सोनाली बाणे यांनी आपल्या टीमला एकत्र आणून स्टुडिओ संचालनापासून ते स्टीचिंग युनिटमधील मास्टरपर्यंत सर्वांना एकत्र करून रोजगाराची संधी उपलब्ध केली आहे. यामधून त्यांना महिन्याला 1 लाख कमाई होते. त्यांचे म्हणणे आहे, मी एकटी पुढे न जाता, आज मी एक मजबूत टीम घेऊन चालते. या टीमने मिळून या ब्रँडला एक नवीन उंचीवर नेले आहे.
advertisement
नाविन्यास च्या यशामागे केवळ सोनालींचा कष्ट आणि दृढनिश्चय आहे, तर त्यांची कुटुंबीय परंपरा आणि त्यांच्या टीमचे सहकार्य देखील महत्त्वाचे आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 17, 2025 6:44 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Success Story: कुटुंबीय परंपरेला आधुनिकतेचा स्पर्श, सोनाली यांनी बनवला पैठणी ब्रँड, कमाई तर पाहाच