ई-पीक पाहणी कशी करावी?
सरकारने या हंगामासाठी नवीन अॅप उपलब्ध करून दिले आहे. शेतकऱ्यांनी खालील टप्प्यांनुसार नोंदणी करावी. गुगल प्ले स्टोअरवरून E-Pik Pahani DCS 4.0.0 हे नवे अॅप डाउनलोड करा. अॅप उघडून आधार क्रमांक आणि त्याला लिंक असलेला मोबाईल नंबर टाकून लॉगिन करा. शेताचं क्षेत्रफळ, पेरणीची तारीख, बांधावरील झाडांची संख्या व प्रकार, तसेच पडीक किंवा चालू पडीत क्षेत्राची माहिती भरा.
advertisement
यंदा सरकारने नवीन नियम लागू केला आहे. शेताच्या सीमेजवळून 50 मीटरच्या आत दोन स्पष्ट फोटो काढून अॅपवर अपलोड करणं अनिवार्य आहे. माहिती अपलोड करताना काही चूक झाली तरी काळजी करू नका.48 तासांच्या आत दुरुस्ती करता येते.
नवे फीचर्स आणि तांत्रिक सुविधा
या अॅपच्या नव्या आवृत्तीत (व्हर्जन) अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत जे की,
जीपीएस लोकेशन ट्रॅकिंग
50 मीटर फोटो व्हेरिफिकेशन
ऑफलाइन मोड
यामुळे नेटवर्क नसतानाही शेतकरी माहिती भरून ठेवू शकतात आणि नंतर इंटरनेट मिळाल्यावर अपलोड करू शकतात.
शेतकऱ्यांसाठी विशेष सहायक
ज्यांना मोबाईल अॅप वापरण्यात अडचण येते, त्यांच्यासाठी प्रत्येक गावात सहायक नेमले जाणार आहेत. हे सहायक शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन करतील – अॅप कसं डाउनलोड करायचं, माहिती कशी भरायची, फोटो कसे काढायचे आणि अपलोड करायचे हे शिकवतील.
मुदतवाढीचा फायदा
मुदतवाढ मिळाल्यामुळे आता शेतकऱ्यांना आपली खरीप पिकांची नोंद नीट आणि व्यवस्थित करण्याची संधी मिळणार आहे. योग्य नोंदणी झाल्यास पुढील काळात शेतकऱ्यांना पीकविमा, अनुदान आणि सरकारी योजना यांचा लाभ सहज मिळू शकेल.
दरम्यान, पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असतानाच ई-पीक पाहणी प्रक्रियेत आलेल्या तांत्रिक अडचणींमुळे त्यांचा त्रास दुप्पट झाला होता. मात्र सरकारने दिलेल्या मुदतवाढीमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. आता 30 सप्टेंबरपर्यंत सर्व शेतकऱ्यांनी नोंदणी पूर्ण करून आपली माहिती अचूकपणे भरावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.