स्नेहल सातव यांनी 2019 साली रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला. त्याआधी त्या स्वयंपाकाच्या ऑर्डर घेत होत्या आणि इतर छोटी-मोठी कामं करत होत्या. पण त्या उत्पन्नावर घरचा प्रपंच भागत नव्हता. त्यामुळे स्नेहल यांनी रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला. स्नेहल सातव यांनी सांगितलं की, “हा निर्णय घेतल्यानंतर त्यांना घरातून आणि समाजाकडूनही खूप विरोध झाला. पण त्यांचा निर्णय ठाम होता. त्यांच्या पतींना शुगरचा त्रास असून, त्यामुळे त्यांच्या हाताची बोटं काढावी लागली आहेत. तसेच दृष्टीही कमी झाल्याने त्या एका जागी बसून असतात. पुण्यात फक्त एका खोलीचं घर असल्याने आणि इतर कोणतंही उदरनिर्वाहाचं साधन नसल्यामुळे स्नेहल यांनी रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला.
advertisement
Aajibainchi Shala: नऊवारी साडी अन् पाठीवर दप्तर, ठाण्यातील अनोखी शाळा, सगळ्याच विद्यार्थिनी साठीपार!
गेल्या सात वर्षांपासून त्या रिक्षा चालवून मुलाचे शिक्षण, पतीचे आजारपण आणि संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत.
लॉकडाऊनपूर्वी रिक्षामधून चांगले उत्पन्न मिळत होते, मात्र आता रिक्षातून हवे तेवढे उत्पन्न मिळत नाही. ओला आणि उबेर सारख्या सेवांचा वापर नागरिक मोठ्या प्रमाणात करत असल्याने उत्पन्नात घट झाली आहे, असे स्नेहल सांगतात.