आल्याचे दर पडले- राज्यातील बाजारात आले दरात काही सुधारणा दिसून आली. आज राज्याच्या बाजारात एकूण 781 क्विंटल आल्याची आवक झाली. यापैकी नागपूर मार्केटमध्ये सर्वाधिक 364 क्विंटल आल्याची आवक होऊन त्यास 5305 प्रतिक्विंटल इतका सर्वसाधारण उच्चांकी भाव मिळाला. तसेच सातारा मार्केटमध्ये सर्वात कमी तीन क्विंटल आल्याची आवक होऊन त्यास 1750 रुपये सर्वात कमी भाव मिळाला.
advertisement
कांद्याची आवक- राज्याच्या कृषी मार्केटमध्ये आज कांद्याची 88 हजार 338 क्विंटल इतकी एकूण आवक झाली. यापैकी सर्वाधिक 48 हजार 970 क्विंटल सर्वाधिक आवक नाशिक मार्केटमध्ये राहिली. नाशिक मार्केटमध्ये कांद्याच्या प्रतीनुसार 342 रुपये प्रतिक्विंटल ते 1523 रुपये प्रति क्विंटल असा बाजार भाव राहिला. तसेच सातारा मार्केटमध्ये अवक झालेल्या 99 क्विंटल कांद्यास सर्वाधिक
1600 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे भाव मिळाला.
सोयाबीनचे दर दबावात- राज्याच्या कृषीमार्केट मध्ये आज एकूण 20 हजार 1 क्विंटल सोयाबीनची आवक राहिली. जालना मार्केटमध्ये 10 हजार 452 क्विंटल सोयाबीनची सर्वाधिक आवक झाली. त्यास सोयाबीनच्या प्रतीनुसार कमीत कमी 3625 ते जास्तीत जास्त 4106 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तर सर्वाधिक 4 हजार 500 रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव नांदेड मार्केटमध्ये मिळाला. छत्रपती संभाजीनगर मार्केटमध्ये केवळ 4 क्विंटल सोयाबीनची आवक होऊन त्यास 2000 रुपये सर्वात कमी बाजारभाव मिळाला.
भिजलेल्या सोयाबीनला कमी दर- व्यापाऱ्यांच्या मते; सोयाबीनचा हमीभाव जरी 5328 रुपये प्रति क्विंटल असला तरी पावसामुळे भिजलेल्या सोयाबीनला तसा दर मिळणे शक्य नाही. बाजारात सध्या उपलब्ध सोयाबीन ओलसर असल्याने सोयाबीनचे सर्वसाधारण भाव 2050 ते 4500 रुपयांपर्यंत दबावात राहिले आहेत.