धाराशिव जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या आकडेवारी नुसार 1, 80, 786 शेतकऱ्यांचे 1, 63, 970 हेक्टरवरील एकूण 33 टक्क्यांहून अधिक पिकांचे नुकसान झाले आहे. आयुक्तांनी तातडीने आकडेवारी जाहीर केली होती. त्यासंदर्भातील प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर करण्यात आला होता. मात्र, निवडणुकीची आचारसंहिता लागली. परंतु आता राज्याच्या मुख्य सचिवांनी प्रस्तावाला मंजूरी दिली असून फक्त मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक आहे.
advertisement
दरम्यान, राज्यात अतिवृष्टी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राला सर्वाधिक फटका बसला आहे. प्रामुख्याने, सोयाबीन, कापूस आणि कांदा पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. मळणीसाठी आलेली सोयाबीन पावसाने ओली झाली असून त्या सोयाबीनला योग्य बाजारभाव मिळत नाही. तसेच कांद्याच्या रोपवाटिका खराब झाल्या आहेत. त्याचा परिणाम कांदा उत्पादनावर होणार आहे.