तिरंग्याची प्रेरणा, देशभक्तीची ओळख
महिंद्राने ‘महिंद्रा युवो टेक+ ५८५ डीआय ४डब्ल्यूडी’ या ट्रॅक्टरचे तीन खास रंगांतील व्हेरिएंट सादर केले आहेत. मेटॅलिक ऑरेंज, एव्हरेस्ट व्हाइट आणि मेटॅलिक ग्रीन हे रंग थेट भारतीय ध्वजाशी नाते सांगतात. हे ट्रॅक्टर केवळ शेतीसाठीचे यंत्र न राहता देशभक्तीचे प्रतीक ठरत आहेत. कंपनीने स्पष्ट केले आहे की ही लिमिटेड एडिशन असल्यामुळे देशभरात ठराविक संख्येतच हे ट्रॅक्टर उपलब्ध असतील.
advertisement
मेटॅलिक ग्रीन व्हेरिएंटची खास ओळख
या तीन रंगांपैकी मेटॅलिक ग्रीन व्हेरिएंट विशेष आकर्षण ठरत आहे. या व्हेरिएंटसोबत काही खास लिमिटेड एडिशन अॅक्सेसरीज देण्यात येत आहेत. यामध्ये दोरी, जेरीकॅन आणि महिंद्राचा ध्वज यांचा समावेश आहे. या अॅक्सेसरीज ट्रॅक्टरची उपयुक्तता वाढवतातच, पण शेतकऱ्यांसाठी अभिमानाची भावना निर्माण करतात.
महिंद्राचा शेतकऱ्यांना सन्मानाचा संदेश
या लॉन्चवेळी महिंद्रा ट्रॅक्टर्सचे उपाध्यक्ष व मार्केटिंग प्रमुख परीक्षित घोष यांनी सांगितले की, “जेव्हा उद्देश आणि अभिमान एकत्र येतो, तेव्हा काहीतरी खास निर्माण होते.” त्यांनी स्पष्ट केले की ही मर्यादित आवृत्ती केवळ आकर्षक डिझाइनपुरती मर्यादित नसून, शेतकऱ्यांच्या सामर्थ्याचे आणि त्यांच्या सक्षमीकरणाचे प्रतीक आहे. हे ट्रॅक्टर २६ जानेवारीपासून देशभरातील निवडक महिंद्रा डीलरशिपमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असतील.
दमदार इंजिन, भरपूर ताकद
महिंद्रा युवो टेक+ ५८५ डीआय लिमिटेड एडिशनमध्ये शक्तिशाली चार-सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन ४५.४ अश्वशक्ती निर्माण करते, तर २१५ न्यूटन मीटर टॉर्कमुळे जड शेतीकामे सहज पार पाडता येतात. कठीण जमीन, खोल नांगरणी किंवा जड अवजारे वापरणे असो, हा ट्रॅक्टर प्रत्येक परिस्थितीत विश्वासार्ह कामगिरी करतो.
अवजारांसाठी मजबूत हायड्रॉलिक क्षमता
या ट्रॅक्टरची हायड्रॉलिक लिफ्ट क्षमता २००० किलो आहे. त्यामुळे विविध शेती अवजारे सहजपणे जोडता येतात. ड्युअल क्लच, एमएसपीटीओ आणि सहाय्यक व्हॉल्व्हमुळे काम अधिक सुलभ होते. तसेच १२ फॉरवर्ड आणि ३ रिव्हर्स गीअर्स असल्याने वेगावर पूर्ण नियंत्रण मिळते.
आरामदायी ड्रायव्हिंग आणि सुरक्षित पकड
पॉवर स्टीअरिंगमुळे दीर्घकाळ ट्रॅक्टर चालवतानाही थकवा जाणवत नाही. पुढील टायर ९.५ x २० इंच आणि मागील टायर १४.९ x २८ इंच आकाराचे असून कोरडी किंवा ओली जमीन असो, उत्कृष्ट पकड मिळते.
