छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील सटाणा येथील शेतकरी मारुती घावटे यांनी 10 जून रोजी 2 एकर शेतात बारा हजार टोमॅटो रोपांची लागवड केली आहे, तर 20 जुलै रोजी देखील त्यांनी पुन्हा एक एकरमध्ये टोमॅटोची लागवड केली. घावटे यांनी 2 एकर टोमॅटो शेतीतून आतापर्यंत सातशे कॅरेट विक्री करून 4 लाख रुपयांचे उत्पन्न घेतले आहे. टोमॅटोचा भाव प्रत्येकी कॅरेट 500 ते 600 रुपये राहिल्यास उर्वरित संपूर्ण शेतीतून आणखी 8 लाख रुपये उत्पन्न निघेल, अशी त्यांची अपेक्षा असल्याचे घावटे यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.
advertisement
Lemon Rate: लिंबाचे दर घसरले! सोलापूर मार्केटमधून मोठं अपडेट, पिवळ्या लिंबाचा भाव काय?
सटाणा येथे घावटे यांनी एकूण 3 एकर क्षेत्रात टोमॅटोची लागवड केली आहे. जूनच्या टोमॅटो लागवडीचे आतापर्यंत 50 टक्के उत्पन्न 4 लाख रुपये निघाले आहे. तर आणखी यामधून 4 लाख आणि जुलैच्या टोमॅटो लागवडीचे 4 लाख असे एकूण 3 एकर शेतीतून टोमॅटोचे बाजार भाव स्थिर राहिल्यास 12 (बारा) लाख उत्पन्न मिळेल असे सांगितले जात आहे. आता सध्याच्या घडीला 20 ते 22 रुपये प्रति किलोने टोमॅटोची विक्री केली जात आहे. एका कॅरेटमध्ये 24 किलो टोमॅटो बसतात.
टोमॅटोच्या झाडांची लागवडीपासून निगा राखावी लागते, तसेच टोमॅटो शेतीला पाणीदेखील तितकेच महत्त्वाचे असते. तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी मोजक्या प्रमाणात पाणी दिले तरी झाडे फुलण्यात आणि चांगले प्रमाणात टोमॅटो येण्यास मदत होते. आमच्या 3 एकरच्या टोमॅटोला ठिबक सिंचनाद्वारे दर 3 ते 4 दिवसांनी पाणी देण्यात येते असे देखील घावटे यांनी म्हटले आहे.
टोमॅटो शेती कशी करावी ?
लागवडीच्या काळात शेतामध्ये खाली मल्चिंग आणि ठिबक अंथरूण, भेसळ डोस करून शेती साफ करून नंतर टोमॅटोची लागवड केल्यानंतर 2 महिन्यातच टोमॅटो निघण्यास सुरुवात होते. चांगली मेहनत आणि परिश्रम घेतल्यास टोमॅटो शेतीतून चांगले उत्पन्न मिळते म्हणून इतर शेतकऱ्यांनी देखील या शेतीकडे वळावे असे आवाहन टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांकडून करण्यात आले आहे.