छंदातून व्यवसायाकडे वाटचाल
केरळमधील लीना थॉमस आणि त्यांचा मुलगा जितू थॉमस यांनी सुरुवातीला मशरूम शेतीकडे केवळ छंद म्हणून पाहिलं. घरच्या घरी प्रयोग करत त्यांनी या शेतीची मूलतत्त्वे समजून घेतली. सुरुवातीला अपयश आलं, नुकसानही सहन करावं लागलं. मात्र हार न मानता त्यांनी प्रत्येक चुकांतून शिकण्याचा प्रयत्न केला. कालांतराने हा छंद अर्धवेळ व्यवसायात बदलला आणि पुढे तो पूर्णवेळ उत्पन्न देणारा उद्योग बनला.
advertisement
एका मशरूम बेडपासून सुरुवात
हा संपूर्ण प्रवास केवळ एका मशरूम बेडपासून सुरू झाला. जितूने आपल्या आईसोबत मिळून फार साध्या साधनसामग्रीत मशरूम लागवड सुरू केली. अनुभव वाढत गेला तसे त्यांनी उच्च-घनतेची मशरूम शेती स्वीकारली. पुढे स्वतःची स्पॉन लॅब उभारून उत्पादनाची गुणवत्ता आणि प्रमाण दोन्ही वाढवण्यात यश मिळवलं.
5000 चौरस फूटांवर उभा राहिलेला फार्म
आज पिरावोम येथे असलेला ‘लीनाज मशरूम फार्म’ सुमारे 5000 चौरस फूट क्षेत्रात पसरलेला आहे. या फार्ममध्ये जवळपास 20,000 मशरूम बेड असून महिन्याला सुमारे 4 टन ताज्या मशरूमचे उत्पादन घेतले जाते. या फार्ममध्ये 15 कामगार कार्यरत आहेत, त्यापैकी जवळपास 80 टक्के महिला कर्मचारी आहेत. त्यामुळे हा उपक्रम महिला सक्षमीकरणाचंही उदाहरण ठरत आहे.
नियंत्रित वातावरणात आधुनिक शेती
मशरूम शेतीसाठी विशिष्ट तापमान आणि आर्द्रता आवश्यक असते. साधारण 30 अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमान राखण्यासाठी फार्मची विशेष रचना करण्यात आली आहे. नियंत्रित वातावरणामुळे कमी जागेत अधिक उत्पादन घेणे शक्य झाले असून पीक सातत्याने मिळते.
गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य
मशरूम हे अत्यंत नाजूक पीक असल्याने थोडासा निष्काळजीपणा संपूर्ण उत्पादनावर परिणाम करू शकतो. तापमान, स्वच्छता आणि कीटक नियंत्रण याकडे लीना आणि जितू विशेष लक्ष देतात. दर्जेदार उत्पादन हाच त्यांच्या यशाचा मुख्य आधार आहे.
दररोज 40 हजार रुपयांपर्यंत कमाई
या व्यवसायातून लीना आणि जितू यांना दररोज सरासरी 40,000 रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते. मशरूम थेट किरकोळ विक्रेत्यांना विकले जात असल्याने मध्यस्थ टाळले जातात आणि नफा अधिक राहतो.
उत्पादनासोबत प्रशिक्षण आणि मार्गदर्शन
ताज्या मशरूमव्यतिरिक्त ते मशरूम स्टार्टर किट्स, स्पॉन, ग्रो रूम उभारणी आणि शेतीसंबंधी सल्ला सेवा देतात. इच्छुक शेतकरी व तरुणांसाठी प्रशिक्षण कोर्सेसही उपलब्ध करून दिले जातात.
नव्या पिढीसाठी प्रेरणादायी कथा
लीना आणि जितू यांची यशोगाथा हे दाखवते की योग्य नियोजन, आधुनिक तंत्रज्ञान आणि मेहनतीच्या जोरावर शेतीतूनही उज्ज्वल भविष्य घडवता येते. साध्या छंदातून सुरू झालेला हा प्रवास आ
