सोलापूर : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत मोहोळ येथील कृषी संशोधन केंद्र येथे लाह्यासाठी वाण विकसित करण्यात आले आहे. फुले पंचमी असे या वाणाचे नाव आहे. या फुले पंचमी लाह्याच्या वाणा संदर्भात अधिक माहिती डॉ. व्ही. आर. पाटील असिस्टंट प्रोफेसर महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.
advertisement
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कृषि संशोधन केंद्र मोहोळ येथील संशोधन केंद्रात कोरडवाहू रब्बी ज्वारीसाठी काम केले जाते. या संशोधन केंद्रात खास लाह्यासाठी फुले पंचमी या वाणाची निर्मिती करण्यात आली आहे. या वाणाचे लाह्या 100 ग्रॅम तयार करण्यासाठी घेतल्यास 95 टक्के लाह्या तयार होतात आणि 5 टक्के लाह्या फुटत नाहीत. हा वाण लाह्या उद्योगासाठी उत्कृष्ट वाण आहे.
कोल्हापूरचं अख्खं मार्केट जाम, 25 खोक्यांचा 'आमदार' पाहिलात का?
फुले पंचमी हा वाण रब्बी हंगामात 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीत लावला तर उत्तम पद्धतीने हा वाण येतो. तसेच हा वाण कोरडवाहूमध्ये चांगल्याप्रकारे उत्पादन देऊ शकतो. हा वाण रब्बी ज्वारी लावणाऱ्या शेतकऱ्यांनी हा वाण लावायला काहीही हरकत नाही. हा वाण कोरडवाहू असल्याने हा वाण अधिकाधिक उत्पादन देऊ शकतो. या वाणाची लागवड करण्या अगोदर शेतकऱ्यांनी लाह्या उद्योजक किंवा व्यवसायिक शोधून शेतकऱ्यांनी याची लागवड करावी, असं डॉ. व्ही. आर. पाटील यांनी सांगितलं.





