पैठण रोडवर असलेल्या ताहेरपूर येथे प्रदीप गाडे यांनी त्यांच्या पपई शेती करणाऱ्या मित्राचा सल्ला घेऊन ही शेती करण्याचा निर्णय घेतला आणि या शेतीत चांगलं उत्पन्न देखील मिळतं त्यामुळे चार एकर क्षेत्रामध्ये 10 मार्च 2025 पपईची लागवड केली. तेव्हा 42 डिग्री सेल्सिअस इतके तापमान असताना देखील पपई लागवडीचे धाडस केलं, तसेच या पपईभागासाठी ठिबक द्वारे पाण्याचे व्यवस्थापन करण्यात आले आहे. साधारणतः बागाची हार्वेस्टिंग सुरू होऊन दीड महिना झाला आहे, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आणि इतर जिल्ह्यात देखील या फळाला भाव कमी असल्याने पपई पंजाब येथील व्यापाऱ्यांना विक्री केली जात असल्याचे प्रदीप गाडे यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.
advertisement
पपई शेती कशी करावी?
चार एकर क्षेत्रात सुरुवातीला 10 ट्रॉली शेणखताचा वापर करण्यात आला. त्यानंतर रोटावेटर केले व बेड केले आणि त्यावेळी तापमान जास्त असल्यामुळे दोन दिवस बेड ओले केले जेणेकरून जमिनीतील तापमान कमी होईल यानंतर दोन दिवसांनी लागवड केली. लागवड झाल्यानंतर चार दिवसांनी युनिकची अळवणी केली, त्यामुळे झाडांचा विकास लवकर होईल आणि मर कमी होईल. त्यानंतर साधारणतः पंधरा दिवसानंतर 10-26-26 आणि मायक्रो न्यूटनचा भेसळ डोस भरला. तसेच नवीन तरुणांना किंवा इतर शेतकऱ्यांना पपई शेती करायची झाल्यास त्यांनी नक्की या शेतीत यावं, कारण की पपई शेती ही फायदेशीर आहे. मात्र त्यासाठी योग्य नियोजन आणि झाडांची काळजी घेणे देखील तितकेच महत्त्वाचे असल्याचे देखील गाडे यांनी म्हटले आहे.