पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता येत्या 25 जानेवारीनंतर शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकरी ओळख क्रमांकाची ही अट लागू नसेल. सध्या नवीन नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना पती-पत्नी तसेच कुटुंबातील 18 वर्षांखालील सदस्यांची आधार नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे.
advertisement
पीएम किसानचे 96 लाख लाभार्थी
पंतप्रधान किसान सन्मान योजनेत पात्र लाभार्थ्यांची संख्या 96 लाख 67 हजार इतकी आहे. त्यात भूमी अभिलेख नोंदीप्रमाणे लाभार्थ्यांची संख्या 95 लाख 95 हजार इतकी असून अजूनही 78 हजार लाभार्थ्यांनी भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत केलेल्या नाहीत. तसेच ई-केवायसी प्रमाणीकरण केलेल्यांची संख्या 95 लाख 16 हजार इतकी आहे. त्यामुळे अद्याप 1 लाख 89 हजार शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण नाही. तसेच बँक खात्याशी आधार संलग्न करणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या 94 लाख 55 हजार असून 1 लाख 98 हजार शेतकऱ्यांचे बँक खात्याशी आधार संलग्न नाही.
दरम्यान, पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा 20 वा हप्ता घेण्यासाठी शेतकऱ्यांना किसान ओळख क्रमांक घ्यावा लागणार आहे. तसेच कुटुंबातील सर्व सदस्यांची आधार जोडणी देखील करावी लागेल.






