त्यामुळे बियाणं आणि रासायनिक खतांचा भाव शासनाने कमी करावा अशी मागणी पवन डकले यांनी केली. अतिवृष्टी तसेच दिवाळीनंतर झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. डोंगरगाव कवाड येथील पवन डकले हे नियमित बटाटा या पिकाचे उत्पादन घेत असतात. तसेच यंदा त्यांना बटाटा पिकाचे खरेदी करण्यासाठी 25 हजार रुपयांचा खर्च आला यासह रासायनिक खते, ड्रीप असा एकूण खर्च 70 हजार रुपये लागला आहे. मात्र बाजारात बटाट्याला भाव नाही. 7 ते 8 रुपये प्रति किलो दराने बटाट्याची विक्री होत आहे. त्यातच पुन्हा आता परतीचा पावसाचा फटका देखील उमटून पडला असल्याने बटाटे सडके असून 70 ते 75 हे पीक खराब झालं असल्याचं डकले यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.
advertisement
शेतीला लावलेला खर्चही पाण्यात
बटाटा पिकातून सध्या तरी नफ्यासारखं काही नाही मात्र नुकसान आहे. दरवर्षी पाहिलं तर बियाणं 1800 ते 2000 हजार रुपये दराने मिळतं. मात्र यंदा पुणे येथील मंचर या ठिकाणाहून 5000 हजार रुपये दराने बियाणं खरेदी केलं आहे. सध्यातरी या बटाटे शेतीतून 30 ते 35 हजार उत्पन्न मिळेल, म्हणजे या शेतीला लावलेला खर्च देखील निघाले कठीण झाले. त्यामध्येच पुन्हा बटाटे पिकासह आदी पिकांना लागणारे रासायनिक खतांचे भाव दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र याकडे शासनाने लक्ष देऊन रासायनिक खतांचे व बियाणांचे भाव कमी करावे असे देखील डकले यांनी म्हटले आहे.