पापरी गावातील शेतकरी रविराज भोसले यांनी पाच एकरात तैवान पिंक या जातीच्या पेरूची लागवड केली आहे. लागवडीपासून ते फवारणीपर्यंत प्रति एकर त्यांना एक ते दीड लाख रुपये खर्च आला आहे. पाच एकरात तैवान पिंक या जातीच्या पेरूची त्यांनी 5 बाय 12 वर लागवड केली आहे. तर तैवान पिंक या पेरूच्या रोपावर सर्वात जास्त मिलीबग रोग पडण्याची शक्यता असते.
advertisement
हातात राहील पैसा, आंतरपीक पद्धती कशी फायदेशीर? प्रयोगशील शेतकऱ्याने सांगितला अनुभव, Video
हा रोग रोपांवर होऊ नये म्हणून फवारणी करावी लागते. सर्वात जास्त तैवान पिंक पेरूची विक्री मुंबईवरून बाहेरच्या देशात विक्री होते. पहिल्यांदाच लागवड केलेल्या तैवान पिंक पेरूतून 40 टन उत्पन्न निघणार आहे. सर्व खर्च वजा करून पाच ते सहा लाखांचे उत्पन्न मिळणार आहे, अशी माहिती रविराज भोसले यांनी दिली. सध्या तैवान पिंक पेरूला बाजारात 60 ते 70 रुपये किलो दर मिळत आहे.
पिंक तैवान पेरूची लागवड करण्याआधी शेतकरी रविराज भोसले यांनी आंतरपीक म्हणून कांद्याची लागवड केली होती. पेरूची झाडे ही लहान असताना त्यांनी कांद्याची लागवड केली होती. तर या कांदा लागवडीसाठी त्यांना पाच एकरात जवळपास एक ते दोन लाखांचा खर्च आला होता. सर्व खर्च वजा करून त्यांना पाच लाखांचे उत्पन्न आंतरपीक घेतलेल्या कांदा पिकातून मिळाले आहे.