TRENDING:

शेती कर्जासाठी RBI चे नवीन नियम जाहीर! किती कर्ज मिळणार? A TO Z माहिती

Last Updated:

Farmer Loan : देशातील लाखो लहान व मध्यम शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) शेती कर्जासाठी नवा महत्त्वपूर्ण नियम लागू केला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : देशातील लाखो लहान व मध्यम शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) शेती कर्जासाठी नवा महत्त्वपूर्ण नियम लागू केला आहे. या नव्या धोरणामुळे आता आर्थिकदृष्ट्या दुर्बल, पण प्रामाणिक मेहनती करणाऱ्या शेतकऱ्यांना शेतीसाठी कर्ज मिळवणे अधिक सुलभ होणार आहे. विशेषतः भांडवलाअभावी शेती करता न येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा निर्णय मोठा आधार ठरणार आहे.
agriculture news
agriculture news
advertisement

नवीन नियम काय? 

आरबीआयने लागू केलेल्या नव्या नियमानुसार, 11 जुलै 2025 पासून बँका शेतकऱ्यांकडून सोने व चांदी गहाण घेऊन 2 लाख रुपयांपर्यंतचे शेती कर्ज देऊ शकतात. या प्रक्रियेत शेतकऱ्याची स्पष्ट संमती आवश्यक आहे. याआधी काही मर्यादित अटींनुसारच शेतकऱ्यांना शेती कर्ज मिळायचे. मात्र आता शेतकरी स्वतःहून आपल्या मौल्यवान धातू गहाण ठेवून अधिक रकमेचं कर्ज घेऊ शकणार आहेत.

advertisement

या निर्णयाचा उद्देश असा आहे की शेतकऱ्याला त्याच्या मालकीची वस्तू (म्हणजे सोने-चांदी) गहाण ठेवून लगेच कर्ज मिळावे, ज्यायोगे तातडीच्या शेतीच्या गरजा पूर्ण करता येतील. यामुळे कर्ज प्रक्रियाही अधिक सुरक्षित व पारदर्शक होणार आहे.

शेतकरी आणि बँक दोघांनाही फायदा

या निर्णयामुळे शेतकऱ्याला आपत्कालीन स्थितीत शेतीसाठी निधी मिळवणे सोपे जाईल. उदा. खतं, बियाणं, मजुरी किंवा सिंचनासाठी पैसे लागल्यास बँकेत थेट सोने-चांदी गहाण ठेवून आवश्यक रक्कम मिळवता येईल. दुसरीकडे, बँकांसाठीही ही प्रक्रिया फायदेशीर आहे, कारण गहाण ठेवलेल्या मालामुळे बँकांचं कर्ज परत न मिळण्याचा धोका कमी होईल.

advertisement

शेतीतील संकटं आणि खर्च वाढलेला

आजचा शेतकरी अनेक अडचणींचा सामना करत आहे. कधी निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकाचं नुकसान होतं, तर कधी बाजारभावात घसरण होते. त्यातच बियाणं, खते, औषधं, मजुरी यांचे दर झपाट्याने वाढत असल्याने शेतीचा खर्च वाढला आहे. परिणामी, अनेक शेतकऱ्यांना कर्ज काढणं अपरिहार्य ठरतं. काही वेळा कर्जाचा बोजा इतका वाढतो की आत्महत्येचे टोकाचे निर्णयही घेतले जातात.

advertisement

अशा पार्श्वभूमीवर आरबीआयचा हा निर्णय वेळीच आलेला आणि सकारात्मक ठरतोय. कारण या माध्यमातून शेतकऱ्यांना पारंपरिक कर्ज पद्धतीपेक्षा अधिक लवचिक पर्याय उपलब्ध होईल.

शेतकऱ्यांना काय करावे लागेल?

शेतकऱ्यांनी सोने-चांदी गहाण ठेवून कर्ज घ्यायचे असल्यास, जवळच्या अधिकृत बँकेत संपर्क साधावा लागेल. बँक शेतकऱ्याची संमती घेतल्यावर त्याला नियमांनुसार 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज मंजूर करू शकते. हे कर्ज शेतीसाठी वापरणे अनिवार्य असेल.

advertisement

नव्या नियमामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, नवीन सोयाबीनचे दर घसरलेलेच, आज काय मिळाला भाव?
सर्व पहा

आरबीआयचा हा नवा निर्णय ग्रामीण भागातील शेती अर्थव्यवस्थेला गती देणारा ठरणार आहे. शेतकऱ्यांना वेळीच भांडवल उपलब्ध झाले, तर उत्पादन क्षमता वाढेल आणि शेती अधिक फायदेशीर होईल. सरकार व आरबीआयकडून असे निर्णय अधिक प्रमाणात घेतले गेले, तर भारतीय शेतकरी पुन्हा एकदा समृद्धीकडे वाटचाल करू शकतो.

मराठी बातम्या/कृषी/
शेती कर्जासाठी RBI चे नवीन नियम जाहीर! किती कर्ज मिळणार? A TO Z माहिती
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल