TRENDING:

Success Story : शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय, महिन्याला शेतकऱ्याची दीड लाख उलाढाल, सांगितला यशाचा मंत्र

Last Updated:

दूध ते नियमितपणे दूध डेअरीला विक्री करतात. या विक्रीतून महिन्याला सुमारे 1 लाख 50 हजार रुपयांची उलाढाल होते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
छत्रपती संभाजीनगर : शेतीला जोडधंदा म्हणून अनेक शेकतरी दुग्ध व्यवसाय करतात. फुलंब्री येथील साहेबराव वाघ यांनी वडिलोपार्जित म्हैस पालनाचा व्यवसाय यशस्वीपणे सुरू ठेवला आहे. त्यांनी पारंपरिक पशुपालनाला दुग्धव्यवसायाची जोड दिली आहे. वाघ यांच्याकडे जाफराबादी आणि मुरा वाणाच्या एकूण 10 म्हशी आहेत. या म्हशींमधून दररोज दूध उत्पादन घेतले जाते. सकाळी सुमारे 50 लिटर आणि संध्याकाळीही जवळपास 50 लिटर असे एकूण दूध उत्पादन 100 ते 120 लिटर इतके आहे. हे दूध ते नियमितपणे दूध डेअरीला विक्री करतात. या विक्रीतून महिन्याला सुमारे 1 लाख 50 हजार रुपयांची उलाढाल होते. तर खर्च वजा करून त्यांना 80 हजार रुपयांचा नफा मिळत असल्याचे लोकल 18 सोबत बोलताना वाघ यांनी सांगितले.
advertisement

फुलंब्री येथे साहेबराव वाघ हे त्यांच्याकडे असलेल्या म्हशींना गवत, उसाचा कडबा कुट्टी, ढेप या सर्व खाद्याचे मिश्रण करून जनावरांना चारा म्हणून दिले जाते. तसेच सकाळच्या 5 वाजेदरम्यान शेण काढणे, दूध काढणे, चारा-पाणी करणे या कामासाठी सकाळी आणि संध्याकाळी दोन तास देणे, हे सर्व कामे वाघ घरीच स्वतः करतात असे दिवसभराचे नियोजन केलेले असते.

advertisement

Reel पाहिली अन् डोक्यात आयडिया आली, नोकरी करता करता बिझनेस सुरू केला, आता इतकी कमाई

तरुणांनी दुग्ध व्यवसायात येण्यासाठी काय करावे?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मिरचीचा ठेचा खाऊन कंटाळा आलाय? ‎तुरीच्या दाण्यांपासून बनवा खास रेसिपी,खाल आवडीने
सर्व पहा

नवीन शेतकरी आणि तरुणांना म्हैस पालन व दूध व्यवसाय करायचा झाल्यास त्यांनी सर्वात अगोदर स्वतः ही कामे करून पहावी. या कामाचा अनुभव घ्यावा, इतर गोठ्यांमध्ये कसे नियोजन केलेले आहे ते पाहायला हवे. या कामांमध्ये आवड असल्यास छोट्या व्यवसायापासून सुरुवात करावी, असे देखील वाघ यांनी म्हटले आहे.

advertisement

मराठी बातम्या/कृषी/
Success Story : शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय, महिन्याला शेतकऱ्याची दीड लाख उलाढाल, सांगितला यशाचा मंत्र
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल