TRENDING:

सांगलीच्या डॉक्टरांची कमाल, 5 मेंढ्यांच्या पालनातून मालामाल, एका कोकराला 3 लाखांचा भाव!

Last Updated:

Sheep Farming: सांगलीतील एका डॉक्टरांनी शेळी आणि मेंढीपालन व्यवसाय सुरू केला आहे. 5 माडग्याळी मेंढीपासून सुरू केलेल्या या व्यवसायातून ते लाखोंची कमाई करत आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्रीती निकम, प्रतिनिधी 
advertisement

सांगली: भरघोस अर्थिक उत्पन्न मिळवून देण्यासाठी प्रसिद्ध असलेली 'माडग्याळी' ही सांगलीच्या जत तालुक्यातील मेंढ्यांची लोकप्रिय प्रजात आहे. याच लोकप्रिय माडग्याळी मेंढ्यांसह देशी शेळ्यांचे पालन करत आटपाडीच्या डॉक्टरांनी पशुपालनाची आवड जोपासली आहे. आटपाडी येथील रहिवासी असलेले मच्छिंद्र पाटील पेशाने डॉक्टर आहेत. आटपाडी शहरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून ते रुग्ण सेवा करतात. क्लिनिक सोबतच त्यांनी शेती आणि पशुपालनाची आवड जपली आहे. याबाबतच लोकल18 शी बोलतान डॉ. मच्छिंद्र पाटील यांनी माहिती दिलीये.

advertisement

डॉ. मच्छिंद्र पाटील यांनी गेल्या दीड वर्षांपासून मेंढीपालनास सुरुवात केली. जाणकार मित्रांच्या सल्ल्याने त्यांनी पाच माडग्याळी मेंढ्या आणि पाच देशी शेळ्या खरेदी केल्या. वडिलोपार्जित शेतामध्येच त्यांनी मुक्त आणि बंदिस्त दोन्ही प्रकारचे गोठे बांधले. शेळ्या-मेंढ्यांचा सांभाळ करण्यासाठी त्यांनी पूर्णवेळ एक व्यवस्थापक नेमला आहे. "मी माझ्या मित्रांचे पाहून शेळ्या-मेंढ्या पाळण्याचा निर्णय घेतला. मला शेती आणि पशुपालनबद्दल पहिल्यापासूनच लळा आहे. मेंढी पालनामुळे माझी आवड ही जपली जाते यासह भरपूर आर्थिक उत्पन्नही मिळते,” असे डॉ. मच्छिंद्र सांगतात.

advertisement

महाराष्ट्रातील असं गाव जिथं भरते खिलार जनावरांची यात्रा, लाखोंची लागते बोली, पाहा Video

अशी घेतात काळजी

डॉ. मच्छिंद्र हे सकाळच्या वेळेमध्ये शेळ्या-मेंढ्यांना भरड, पेंड, मका खायला घालतात. त्यानंतर तीन तास मुक्त गोठ्यामध्ये सोडतात. तिथे शेळ्या-मेंढ्या त्यांच्या आवश्यकतेनुसार चारापाणी घेतात. दुपारच्या वेळेमध्ये गारव्यासाठी शेळ्या-मेंढ्यांना ओढ्याकाठी गवतावरती चरायला घेऊन जातात. सायंकाळी 5 वाजता मुक्त गोठ्यामध्ये सोडतात. चारापाणी देऊन रात्रीच्या वेळी बंदिस्त गोठ्यामध्ये शेळ्या-मेंढ्या कोंडल्या जातात.

advertisement

दीड वर्षात पाच लाखांची विक्री

डॉ. मच्छिंद्र यांना दीड वर्षात माडग्याळी मेंढीपासून दोन चांगली पिल्ले मिळाली. एका पिलाची 1 लाख 85 हजार तर दुसऱ्या पिलाची 3 लाख रुपयांना विक्री झाली. याशिवाय शेळ्या-मेंढ्यांपासून मिळणाऱ्या शेणखताचा उपयोग डॉक्टर स्वतःच्या शेतीसाठी करतात. तसेच देशी शेळ्यांची पिले मांस विक्रीसाठी दिली जातात. पाच देशी शेळ्या आणि पाच माडग्याळी मेंढ्यांच्या पालनातून वर्षाकाठी पाच लाखांचा नफा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

advertisement

शेळ्या-मेंढ्यांचे पालन हे शेतीपूरक व्यवसाय म्हणून अत्यंत फायदेशीर ठरतो. अल्पभूधारक शेतकऱ्यांना तसेच पशुपालनाची आवड असणाऱ्या प्रत्येकाला करता येणारा हा व्यवसाय असल्याचा अनुभव डॉ.मच्छिंद्र पाटील यांनी सांगितला.

माडग्याळी मेंढ्यांच्या पिल्लांना लाखात भाव

माडग्याळी मेंढी पालना व्यवसाय करताना प्रथम माडग्याळी मेंढ्या विकत घ्याव्या लागतात. या मेंढ्यांचे भाव 50 हजारांपासून पुढे आहेत. तसेच उच्च प्रतीची पिले आणि नर मेंढ्याचे भाव देखील लाखात असल्याने या मेंढीपालनाच्या व्यवसायामध्ये मोठी आर्थिक गुंतवणूक करावी लागते. योग्य व्यवस्थापन केले तर दीड दोन वर्षातच भांडवल गुंतवणुकीचा खर्च निघून जातो. तसेच पिले विक्रीसह

मराठी बातम्या/कृषी/
सांगलीच्या डॉक्टरांची कमाल, 5 मेंढ्यांच्या पालनातून मालामाल, एका कोकराला 3 लाखांचा भाव!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल