डाळिंब शेती ठरली फायदेशीर
नारायण चव्हाण पाटील हे सांगली जिल्ह्यातील आटपाडी गावचे रहिवाशी आहेत. शेतीला मेहनतीचं काम मानून तरुण पिढी दूर जात असताना, नारायण पाटील यांनी डाळिंबाची 5000 रोपे लावून बागेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती यशस्वी केली आहे. आजही ते एका नोकरदाराच्या पगाराच्या दुप्पट उत्पन्न शेतीतून मिळवत आहेत.
1982 मध्ये केली द्राक्षाची लागवड
advertisement
एकत्र कुटुंब असताना 1982 मध्ये द्राक्ष शेती सुरू करून पुढे गणेश डाळिंबाची यशस्वी लागवड केली. आज ते 20 एकर शेतीत डाळिंबासह मका, गहू, हरभरा, भाजीपाला घेतला जातो. शेतीच्या कामात तीन कुटुंबे त्यांना मदत करतात. त्यांच्याकडे शेतीविषयी खोल ज्ञान असून, कोणत्या हवामानात कोणती पिके घ्यावीत, कोणत्या अवस्थेत योग्य फवारणी करावी, ड्रिपमधून अन्नद्रव्ये कशी द्यावीत यावर त्यांचा अभ्यास आहे. दगडी विहिरींचे बांधकाम, दोन ट्रॅक्टर, सीसीटीव्ही सुरक्षायंत्रणा आणि नियोजनबद्ध व्यवस्थापन यामुळे त्यांनी शेतीत नवे आयाम गाठले आहेत. आज नारायण चव्हाण पाटील डाळिंब शेतीतून लाखो रूपयांची कमाई करत आहेत.