आल्याची आवक: राज्याच्या मार्केटमध्ये आज एकूण 2278 क्विंटल आल्याची आवक झाली. यापैकी मुंबई मार्केटमध्ये सर्वाधिक 1257 क्विंटल आल्याची आवक झाली. त्यास प्रतीनुसार 4000 ते 6000 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला. तसेच अमरावती मार्केटमध्ये आवक झालेल्या 69 क्विंटल आल्यास प्रतीनुसार 5000 ते 6000 रुपये दरम्यान सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
शेवग्याचे दर स्थिर: राज्याच्या मार्केटमध्ये आज एकूण 102 क्विंटल शेवग्याची आवक झाली. यापैकी मुंबई मार्केटमध्ये सर्वाधिक 51 क्विंटल आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 6000 ते 9000 रुपये दरम्यान बाजारभाव मिळाला. तसेच पुणे मार्केटमध्ये आवक झालेल्या 4 क्विंटल शेवग्यास 15000 रुपये सर्वात जास्त बाजारभाव मिळाला.
advertisement
डाळिंबाचे आवक: आज राज्याच्या मार्केटमध्ये 1079 क्विंटल डाळिंबाची एकूण आवक झाली. यापैकी 750 क्विंटल सर्वाधिक आवक मुंबई मार्केटमध्ये राहिली. त्यास सर्वसाधारण 10000 ते 15000 रुपये दरम्यान बाजारभाव मिळाला. तसेच छत्रपती संभाजीनगर मार्केटमध्ये आवक झालेल्या 4 क्विंटल डाळिंबास 16000 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.