सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील हराळवाडी गावातील शेतकरी रंगनाथ गावडे यांनी एका एकरात उन्हाळी भुईमूग शेंगाची लागवड केली होती. उन्हाळी भुईमूग शेंगा लागवडीसाठी रंगनाथ गावडे यांना एकरी 30 ते 35 हजार रुपये पर्यंत खर्च आला होता. तर शेतकरी रंगनाथ गावडे यांना एका एकरातून 40 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
advertisement
D.Ed. केलं, पण नोकरी केली नाही! 25 वर्षांच्या काजलने निवडली वेगळी वाट; आज कमवते लाखो रुपये
मागील वर्षी बाजारात उन्हाळी भुईमूग शेंगाला शंभर रुपये किलो प्रमाणे दर मिळाला होता. तर सर्व खर्च वजा करून गावडे यांना एक ते दीड लाख रुपये पर्यंतचे उत्पन्न एका एकरातून मिळाले होते. तर यंदाच्या वर्षी भुईमुगाची लागवड जास्त झाल्यामुळे दर 50 टक्के खाली घसरले असून बाजारात भुईमूगाला 40 रुपये किलो दर भेटत आहे. एका एकरातून त्यांना 40 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उन्हाळी भुईमूग शेंगाला चांगले दर मिळतील या आशेने मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. मात्र सध्या भुईमुगाचे दर पडल्याने शेतकरी मेटाकुटीला आला असून शासनाने शेतीमालाला किमान दर द्यावा, अशी मागणी शेतकरी राजा सरकारकडे करत आहे.