TRENDING:

Farmer Success Story: सोलापूरचा शेतकरी भारीच, फक्त 15 गुंठ्यात केली झेंडूची लागवड, 4 महिन्यात लाखभर कमाई, Video

Last Updated:

अंगी मेहनत करण्याची इच्छा, जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणतेही कार्य आपण यशस्वी करू शकतो. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील शेतकरी सिताराम माळी यांनी अवघ्या 15 गुंठ्यात झेंडूची फुलशेती केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सोलापूर: अंगी मेहनत करण्याची इच्छा, जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणतेही कार्य आपण यशस्वी करू शकतो. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील शेतकरी सिताराम माळी यांनी अवघ्या 15 गुंठ्यात झेंडूची फुलशेती केली आहे. तर यासाठी त्यांना 25 हजार रुपयांपर्यंत खर्च आला असून, सर्व खर्च वजा करून 15 गुंठ्यात त्यांनी 1 लाख 22 हजार रुपयांचे उत्पन्न घेतले आहे.
advertisement

माढा तालुक्यातील उपळाई बुद्रुक येथील शेतकरी सिताराम अनंत माळी हे गेल्या पाच ते सात वर्षांपासून झेंडू फुलाची शेती करत आहेत. प्रत्येक वर्षी सिताराम माळी हे झेंडू फुलाची शेती करत आहेत. 15 गुंठ्यात अडीच हजार झेंडू फुलांच्या रोपांची लागवड केली आहे. सुरुवातीला सिताराम माळी यांना झेंडूच्या फुलशेती संदर्भात काहीही माहिती नव्हती. परंतु मित्राची साथ भेटल्याने सिताराम माळी यांना झेंडू फुलशेतीचा छंद लागला आहे. 15 गुंठ्यात लागवड केलेल्या झेंडूच्या बागेवर भुरीरोग पडला होता.

advertisement

Goat Farming: नोकरी सोडली, तरुणाने घेतल्या 5 शेळ्या, आता वर्षाला 5 लाखांची कमाई, Video

तेव्हा सिताराम यांच्या मित्र जलंदर पारसे यांनी निसोडिया या नावाचा औषध फुलांवर फवारणी करण्याचा सल्ला दिला होता. सिताराम यांनी तो औषध आणला आणि फुलांवर फवारणी केलीफुलांवर पडलेला रोग निघून गेला आणि त्यांची बाग त्या रोगापासून मुक्त झाली. पंधरा गुंठ्यात सिताराम माळी यांना झेंडूची फुलशेती करण्यासाठी 25 ते 30 हजार रुपयांपर्यंत खर्च आला आहे. तर सर्व खर्च वजा करून 15 गुंठ्यात शेतकरी सिताराम माळी यांनी चार महिन्यात 1 लाख 22 हजार रुपयांचे उत्पन्न घेतले आहे.

advertisement

झेंडूच्या फुलावर रासायनिक खतांचा वापर जास्त न करता सिताराम हे घरच्या घरी नैसर्गिक पद्धतीने बेसनगूळ आणि गोमुत्राचा वापर करून खत बनवतात आणि त्याचीच फवारणी करतात. त्यामुळे रासायनिक खतांच्या होणाऱ्या खर्चावर बचत होते. सिताराम माळी हे झेंडू फुलाची विक्री सोलापूर आणि मुंबईच्या मार्केटमध्ये करत आहेत. सध्या बाजारात झेंडू फुलाला 50 ते 60 रुपये किलोने दर मिळत आहे. 15 गुंठ्यातून सुद्धा अधिकाधिक उत्पन्न घेता येते हे शेतकरी सिताराम माळी यांनी सिद्ध करून दाखवले आहे.

advertisement

मराठी बातम्या/कृषी/
Farmer Success Story: सोलापूरचा शेतकरी भारीच, फक्त 15 गुंठ्यात केली झेंडूची लागवड, 4 महिन्यात लाखभर कमाई, Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल