Goat Farming: नोकरी सोडली, तरुणाने घेतल्या 5 शेळ्या, आता वर्षाला 5 लाखांची कमाई, Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
सुरुवातीला चार ते पाच शेळ्या आणून त्यांनी या बंदिस्त शेळीपालनाला सुरुवात केली होती. आज जवळपास त्यांच्याजवळ 25 ते 30 शेळ्या असून वर्षाला 5 लाखांची कमाई करत आहेत.
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील चिंचोली गावातील उच्चशिक्षित तरुण रोहित लोंढे हे गेल्या 9 ते 10 वर्षांपासून बंदिस्त शेळीपालन करत आहेत. सुरुवातीला चार ते पाच शेळ्या आणून त्यांनी या बंदिस्त शेळीपालनाला सुरुवात केली होती. आज जवळपास त्यांच्याजवळ 25 ते 30 शेळ्या असून वर्षाला 5 लाखांची कमाई करत आहेत.
रोहित लोंढे राहणार चिंचोली, तालुका माढा, जिल्हा सोलापूर यांचे शिक्षण बी.फार्म झाले आहे. रोहित लोंढे हे एका कंपनीत कामाला होते. दोन वर्षे काम करून त्यांनी शेवटी शेती करायचा निर्णय घेतला. गावाला परत येऊन त्यांनी शिवांजली या नावाने शेळी पालन सुरू केले. सुरुवातीला पाच शेळ्यांपासून त्यांनी या व्यवसायाला सुरुवात केली होती. हळूहळू हा व्यवसाय त्यांचा वाढत गेला.
advertisement
आज त्यांच्याजवळ जवळपास 25 ते 30 शेळ्या गोठ्यात आहेत. दर तीन ते चार महिन्यांला शेळी आणि बोकडची विक्री केली जाते आणि यातून उत्पन्न देखील चांगले मिळते. रोहित लोंढे यांच्याकडे उस्मानाबादी, बीटल आणि बिटल क्रॉस जातीचे बोकड मिळत आहेत. लॉकडाऊन आधी ग्राहक शेळी फार्मवर येऊन बोकडाची पाहणी करून खरेदी करत होते. पण आता सोशल मीडियावर व्हिडिओ टाकून आता त्यांची विक्री केली जाते.
advertisement
बंदिस्त शेळीपालनमध्ये गोठ्याची स्वच्छता दररोज केली जाते. स्वच्छता दररोज केल्यामुळे कोणताही आजार शेळीला किंवा बोकडाला होत नाही. तर दररोज त्यांना सकाळी सुका चारा, दुपारी ओला चारा आणि संध्याकाळी मक्का, खपरी पेंड खाण्यासाठी दिले जाते. तसेच शेळीपासून मिळणाऱ्या शेणखताला देखील चांगली मागणी आहे. पण रोहित लोंढे हे सेंद्रिय पद्धतीने शेती करत आहेत त्यामुळे शेळीपासून मिळणाऱ्या शेणखताचा वापर ते आपल्या शेतात शेणखत म्हणून करत आहेत. सध्या बाजारात शेळीपासून तयार होणाऱ्या शेणखताला सात हजार रुपये ट्रॉली अशी मागणी आहे. तर या बंदिस्त शेळीपालनातून उच्चशिक्षित रोहित लोंढे हे वर्षाला 5 लाखांची कमाई करत आहेत.
advertisement
तरुण शेतकऱ्यांनी किंवा उच्चशिक्षित तरुणांनी नोकरीत हवा तसा उत्पन्न मिळत नसेल तर त्यांनी शेती करण्यास सुरुवात करावी. आणि जोडधंदा म्हणून शेळीपालन करावे. काही वेळ लागेल पण उत्पन्न चांगलेच मिळेल असा सल्ला उच्चशिक्षित तरुण रोहित लोंढे यांनी दिला आहे.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
June 14, 2025 3:15 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
Goat Farming: नोकरी सोडली, तरुणाने घेतल्या 5 शेळ्या, आता वर्षाला 5 लाखांची कमाई, Video