Jalna Rain: 10 वर्षे जपलं, पाणी विकत घेऊन घातलं, अर्ध्या तासात शेतकऱ्याच्या स्वप्नांचा चुराडा, काय झालं?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
Agriculture Loss: मराठवाड्यात पुन्हा एकदा वादळी पावसाचं संकट घोंघावत आहे. जालन्यातील शेतकऱ्याची लिंबोणीची बाग उद्ध्वस्त झालीये.
जालना: यंदा मे महिन्यापासून सुरू असणाऱ्या वादळी पावसाने मराठाड्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जून महिन्यात देखील हे अस्मानी संकट कायम आहे. नुकतेच जालना जिल्ह्यात झालेल्या वादळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांना फटका बसला आहे. वादळी वाऱ्यामुळे नंदापूर येथील शेतकरी प्रकाश उबाळे यांची लिंबोणीची बाग उन्मळून पडली आहे. 10 वर्षांची झाडे जमिनदोस्त झाल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
जालना जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. वादळी वाऱ्यासह होत असलेल्या या पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान देखील होत आहे. नंदापूर येथील उबाळे यांची दहा वर्षांची लिंबोणीची एक एकर बाग आहे. वादळी पावसात या बागेचे नुकसान झाले असून झाडे उखडून पडली आहेत. त्यामुळे उबाळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.
advertisement
पाण्याची कमतरता असतानाही उबाळे यांनी मोठ्या प्रयत्नांनी लिंबोणी जपली होती. बागेसाठी मोठा खर्च केला होता. तसेच 4 बोअरवेल घेतल्या होत्या. तरीही पाण्याची कमतरता निर्माण झाल्याने पाणी विकत घेऊन बाग जगवली होती. मुला मुलींचे शिक्षण आणि मुलींची लग्नं आणि घर खर्च अशा सगळ्या अवलंबून होतं. परंतु उदरनिर्वाहाचे साधन असलेली बागच भुईसपाट झाल्याने त्यांच्यावर दुःखाचाडोंगर कोसळला आहे.
advertisement
नेकम घडलं काय?
सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या पावसात लिंबोणी बागेतील काही झाडांचे नुकसान झाले. तर काही झाडे पूर्णपणे उन्मळून पडली. तलाठ्यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला आहे. सरकारने या अस्मानी संकटाची दखल घेऊन तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केलीये.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
June 14, 2025 1:35 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
Jalna Rain: 10 वर्षे जपलं, पाणी विकत घेऊन घातलं, अर्ध्या तासात शेतकऱ्याच्या स्वप्नांचा चुराडा, काय झालं?