मराठवाड्यात शिरलं मान्सूनचं वारं, सोसाट्याचा वारा अन् दाणादाण 7 जिल्ह्यांसाठी अलर्ट

Last Updated:
Marathwada Rain: सध्या राज्यात पावसाचा जोर वाढत आहे. मराठवाड्यात देखील जोरदार पाऊस सुरू असून 8 जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे.
1/5
गेल्या तीन दिवसांपासून मराठवाड्यात जोरदार पावसाचे सत्र सुरू आहे. शुक्रवारी देखील मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याचे पाहायला मिळाले. 14 जून रोजी देखील मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे.

advertisement
2/5
छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये आज 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहणार आहेत. तसेच विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

3/5
लातूर, धाराशिव, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये देखील 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहतील. तसेच विजांच्या कडकडाटात जोरदार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे.

4/5
मागील तीन दिवसांपासून होत असलेल्या वादळी पावसामुळे दिवसभर उकाडा आणि आद्रता जाणवत आहे. तसेच सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस येत आहे.

5/5
दरम्यान, दिवसभराच्या उकड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना सायंकाळी आलेल्या पावसाच्या सरींनी काहीसा दिलासा मिळत आहे. तर मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये खरिपाच्या पेरण्यांना वेग आल्याचे चित्र आहे. तरीही हवामानाचा अंदाज घेऊन नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement