सोलापूर : नारळ म्हटलं की आपणास कोकणाची आठवण होते. परंतु सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील कुरुल या गावात 60 वर्षीय आजोबांनी नारळ बाग फुलवली आहे. ही किमया कुरुल गावातील विष्णू तुकाराम ननवरे यांनी साधली आहे. नारळाच्या या बुटक्या जातीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. या संदर्भात अधिक माहिती 60 वर्षीय आजोबा विष्णू ननवरे यांनी Local 18 बोलताना दिली.
advertisement
विष्णू ननवरे यांचे शिक्षण 1969 ला अकरावी पर्यंत झाले आहे. सोलापूरातील विष्णू ननवरे या आजोबांनी तज्ज्ञांच्या मदतीने 40 डिग्री सेल्सिअस तापमानात त्यांनी ही नारळाची बाग एका एकरात फुलवली. एका एकरात नारळाच्या झाडांची रोप 15 बाय 15 वर लागवड केली आहे.
सोलापूरचा शेतकरी पाण्यात पिकवतोय पैसा, शेततळ्यातून दुहेरी उत्पन्न, पाहा केलं काय?
एका एकरात 145 नारळाची रोपे त्यांनी लावली आहेत. एका नारळाच्या झाडापासून विष्णू ननवरे यांना शंभर पेक्षा अधिक नारळ मिळत आहेत. ही नारळाची बाग तयार करण्यासाठी ननवरे यांना 70 ते 75 हजार रुपये पर्यंत खर्च आला आहे. तसेच विष्णू ननवरे यांनी या नारळाच्या बागेत दोन वेळा कांदा आणि मेथीच्या भाजीचे आंतरपीक घेऊन दोन वर्षात दोन लाखाचे उत्पन्न देखील त्यांनी मिळवले आहे.
30 रुपये दराप्रमाणे एका झाडापासून जवळपास 5 ते 6 हजारांचा फायदा होतो. तर 100 झाडे वर्षाकाठी 50 ते 60 हजारांचे उत्पादन देतात. तर 145 झाडे एकरी 4 ते 5 लाखांचं उत्पादन देतात. ही नारळ तुम्ही अगदी हाताने तोडू शकता. या झाडाला भरपूर नारळ येतात. या झाडांची उंची अगदी कमी असल्याने तोडणीला अडचण येत नाही. नारळ हे शरीरासाठी अमृत असल्याने त्याची हातोहात विक्री होते. विष्णू ननवरे यांच्या नारळाच्या बागेचे पंचक्रोशीतच नाही तर सोलापूर जिल्ह्यात कौतुक होत आहे.