पैसे कुठून द्यायचे?
या प्रकरणावर संजीतपूरमधील शेतकऱ्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “आम्ही आधीच नैसर्गिक आपत्तीमुळे उद्ध्वस्त झालो आहोत. शेतजमिनीतील पिके पाण्याखाली गेल्याने काहीही उत्पादन मिळाले नाही. अशा अवस्थेत आम्ही बँकेला पैसे कुठून द्यायचे? सरकारने सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. पण आजही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्याउलट बँकेकडून वसुलीच्या नोटिसा मिळत आहेत.”
advertisement
कर्जमाफीची मागणी
शेतकऱ्यांनी या पार्श्वभूमीवर संपूर्ण कर्जमाफीची मागणी केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, सध्या दिलासा न मिळाल्यास पुढील हंगामात पेरणी करणेही शक्य होणार नाही. त्यामुळे सरकारने तातडीने पुढे येऊन शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.
धाराशिवमधील संजीतपूर गावातील प्रकरण हे संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांच्या परिस्थितीचे चित्र स्पष्ट करणारे आहे. पिकांचे नुकसान, सरकारी मदतीची प्रतीक्षा आणि त्याच वेळी बँकांचा तगादा या तिन्ही समस्यांमुळे शेतकरी हतबल झाले आहेत.
दिवाळीपर्यंत मदतीची प्रतीक्षा
शेतकऱ्यांना दिवाळी पर्यंत मदत देऊ असं आश्वासन सरकारकडून देण्यात आले आहे. सध्या नुकसानग्रस्त भागांमध्ये पंचनामे सुरू असून २ ते ३ ऑक्टोबरपर्यंत पंचनाम्याचा अहवाल येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. अशातच आता शेतकरी येणाऱ्या मदतीकडे डोळे लावून बसला आहे.