TRENDING:

Soyabean Subsidy : आधीच सोयाबीनला कमी भाव त्यातही अनुदान रखडलं, पोर्टलच्या समस्येने शेतकरी हैराण

Last Updated:

agriculture news :सोयाबीनचे दिवसेंदिवस कमी होणारे उत्पादन याचा विचार करून राज्य सरकारने अर्थसंकल्पामध्ये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5000 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या आधी सप्टेंबर महिन्याची शेवटच्या आठवड्यात अनुदानासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली. मात्र राज्यातील अनेक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची माहिती चुकीची भरल्यामुळे अनुदान रखडले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
लातूर : सोयाबीनचे दिवसेंदिवस कमी होणारे उत्पादन याचा विचार करून राज्य सरकारने अर्थसंकल्पामध्ये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5000 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या आधी सप्टेंबर महिन्याची शेवटच्या आठवड्यात अनुदानासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली. मात्र राज्यातील अनेक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची माहिती चुकीची भरल्यामुळे अनुदान रखडले आहे. पुढे जाऊन चुकलेली माहिती एडिट करण्यासाठी पोर्टलवर ऑप्शन उपलब्ध झाला. परंतु तरी सुद्धा माहिती दुरुस्त होत नव्हती. या तांत्रिक अडचणीचा फटका मात्र शेतकऱ्यांना बसत आहे. अनेक शेतकऱ्यांचे अनुदान प्रलंबित आहे.
 आधीच सोयाबीनला कमी भाव त्यातही अनुदान रखडलं,
आधीच सोयाबीनला कमी भाव त्यातही अनुदान रखडलं,
advertisement

राज्य सरकारने पुढे जाऊन अनुदान ई - पीक पाहणीवर पिकांची नोंद केलेल्या शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांनी तो निर्णय पुन्हा मागे घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ई - पीक पाहणीची अट शिथिल करण्याचा निर्णय घेतला. मात्र ती फक्त एक घोषणाच राहिली. ई - पीक पाहणी अॅपवर नोंद करूनही शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाही.

advertisement

सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात अनुदान वाटप करण्यात आले. परंतु चुकीची माहिती भरलेल्या शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित राहावे लागले आहे. त्यामुळे आता आम्हाला अनुदान कधी मिळणार? असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत.

सोयाबीनचे उत्पादन घटले

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
तुम्ही कधी खाल्लीये का मासे चकली? दुर्गा यांचा व्यवसाय हिट,महिन्याला 1 लाख कमाई
सर्व पहा

सोयाबीनच्या दरामध्ये वाढ होत नसल्याने शेतकरी सध्या चिंतेत आहे. यंदाच्या वर्षी असमतोल वातावरणामुळे आणि अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच उत्पादनातही घट झाली आहे. प्रति एकर 4 ते 5 क्विंटल सोयाबीनचे उत्पादन निघत असते. त्यासाठी 16, 400 रुपये किमान खर्च येत असतो. सध्या सोयाबीन विक्रीमधून 12 ते 16 हजार रुपये मिळत असल्याने तब्बल 400 ते 4000 रुपयांचा तोटा होत आहे. त्यामुळे सोयाबीनला 6000 रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळावा अशी मागणी शेतकरी करत आहेत.

advertisement

मराठी बातम्या/कृषी/
Soyabean Subsidy : आधीच सोयाबीनला कमी भाव त्यातही अनुदान रखडलं, पोर्टलच्या समस्येने शेतकरी हैराण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल