TRENDING:

शिक्षकी पेशा सांभाळून सेंद्रिय शेतीचा घेतला वसा, ॲपल बोरांच्या शेतीमधून प्रकाश यांना दरवर्षी 5 लाख नफा

Last Updated:

शिक्षकी पेशा सांभाळून धानुरे यांनी सेंद्रिय शेतीचा वसा घेतला आहे. ॲपल बोरांच्या शेतीमधून ते दरवर्षी 5 ते 6 लाखांचा निव्वळ नफा सहज मिळवत आहेत. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नारायण काळे, प्रतिनिधी 
advertisement

जालना : इच्छा असेल तर मार्ग दिसेल असं आपल्याकडे म्हटले जाते. जालन्यातील शिक्षक असलेल्या प्रकाश धानुरे यांना हा वाक्प्रचार तंतोतंत लागू होतो. शिक्षकी पेशा सांभाळून धानुरे यांनी सेंद्रिय शेतीचा वसा घेतला आहे. त्यांच्या शेतात असलेले तब्बल चार प्रकारचे ॲपल बोरे सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. विशेष म्हणजे या ॲपल बोरांचे ते स्वतःच रस्त्यावर स्टॉल लावून विक्री करत आहेत. सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या या बोरांना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ॲपल बोरांच्या शेतीमधून ते दरवर्षी 5 ते 6 लाखांचा निव्वळ नफा सहज मिळवत आहेत.

advertisement

जालना शहरात वास्तव्यास असलेल्या प्रकाश धानुरे यांची रोहनवाडी शिवारामध्ये रस्त्यालगत शेतजमीन आहे. शहरातीलच एका खाजगी शाळेतील शिक्षक म्हणून काम करतात. शेतीची आवड असल्याने आणि शेतामध्ये वेगवेगळे प्रयोग करण्यास इच्छुक असल्याने ते ॲपल बोरांच्या शेतीकडे वळले.

खर्च एका एकरात फक्त 6 हजार रुपये, शेतकरी करतोय 10 वर्षांपासून लाखोंचं उत्पन्न मिळवून देणारी ही शेती PHOTOS

advertisement

2018 मध्ये पहिल्यांदा त्यांनी ॲपल बोराच्या शेतीला सुरुवात केली. सुरुवातीला थाई ॲपल या वाणाची दहा बाय पंधरा अंतरावर त्यांनी लागवड केली. मशागत करत असताना कोणत्याही प्रकारची रासायनिक खते आणि कीटकनाशके वापरली नाहीत. ग्राहकांचा वाढता प्रतिसाद पाहून कश्मीरी रेड ॲपल, बोल सुंदरी, मिस इंडिया आणि त्याचबरोबर काही गावरान बोरांची वाण देखील त्यांच्याकडे आहेत.

advertisement

जालना घनसावंगी रस्त्यावर शेतालगत या बोरांची स्टॉल लावून विक्री करतात. थाई ॲपल बोरांना 60 रुपये प्रति किलो असा दर मिळतो. तर रेड कश्मीरी, मिस इंडिया आणि बॉल सुंदरी या जातीच्या बोरांची 100 रुपये प्रति किलो याप्रमाणे ते विक्री करतात. जालना घनसावंगी रस्त्यावर सकाळपासून सायंकाळपर्यंत त्यांच्या स्टॉलवर ग्राहकांची बोरे खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी पाहायला मिळते. तर रोज 5 ते 6 हजारांची बोर येथे सहज विक्री करतात.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नोकरी मिळत नसल्याने घेतला निर्णय,तरुणाने केली रेशीमची शेती, कमाई तर पाहाच
सर्व पहा

नोकरी व्यवसाय सांभाळून आवड म्हणून मी सेंद्रिय शेतीकडे वळलो. माझ्याकडे पांढरी जांभूळ, केशर आंबा तसेच चिकूची देखील बाग आहे. या सर्व रोपांचे व्यवस्थापन मी सेंद्रिय पद्धतीने कोणत्याही रासायनिक द्रव्यांचा वापर न करता करतो. शेती करत असताना आपण काय पिकवतो यापेक्षा लोकांना काय हवं आहे हे विचारात घेणं जास्त गरजेचं असल्याचं प्रकाश धानुरे यांनी सांगितलं.

मराठी बातम्या/कृषी/
शिक्षकी पेशा सांभाळून सेंद्रिय शेतीचा घेतला वसा, ॲपल बोरांच्या शेतीमधून प्रकाश यांना दरवर्षी 5 लाख नफा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल