ज्या जिल्ह्यांना अधिक प्रभाव
कोकण, खानदेश, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव, बीड, नांदेड, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, वर्धा आणि अमरावती या जिल्ह्यांत पुढील काही दिवस वातावरणात ढगाळपणा जाणवेल.या भागांमध्ये एखाद्या दिवशी विजांचा गडगडाट आणि गारपिटीसह किरकोळ पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
मुंबईसह कोकणात ढगाळ वातावरण
advertisement
मुंबईत सकाळी आकाश ढगाळ राहील, तर दुपारी हवामान निरभ्र होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कोकण किनारपट्टीवर ढगाळ वातावरणामुळे हवेत गारवा जाणवू शकतो.मात्र,जोरदार पावसाचा इशारा दिलेला नाही.
तापमानात थोडी घट अपेक्षित
हवामानतज्ज्ञ यांनी दिलेल्या माहितीनुसार, “सध्या महाराष्ट्रात उष्णतेची लाट नाही, तसेच रात्रीही फारसा उकाडा जाणवत नाही. मात्र शनिवारपासून पुढील आठवड्यात कमाल तापमानात सुमारे दोन अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उन्हाच्या झळा काहीसे कमी होतील.” विदर्भातील काही भागांमध्ये सध्या उष्ण हवामान असून, गडचिरोली, नागपूर, चंद्रपूर या जिल्ह्यांत उष्म्याचा प्रभाव अधिक जाणवत आहे.
