TRENDING:

महार वतन जमीन म्हणजे काय रे भाऊ! या जमिनीची खरेदी-विक्री करता येते का? कायदा काय सांगतो?

Last Updated:

Mahar Vatan Jamin : दोन दिवसांपूर्वी महार वतनातील जमिनीच्या खरेदी-विक्रीचा एक प्रकरण समोर आल्यानंतर या जमिनींच्या कायदेशीर स्थितीबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. अनेकांना या जमिनींच्या व्यवहारांविषयी संभ्रम आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : दोन दिवसांपूर्वी महार वतनातील जमिनीच्या खरेदी-विक्रीचा एक प्रकरण समोर आल्यानंतर या जमिनींच्या कायदेशीर स्थितीबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. अनेकांना या जमिनींच्या व्यवहारांविषयी संभ्रम आहे. या पार्श्वभूमीवर महार वतन जमीन म्हणजे नेमकी काय? तिचा कायदेशीर दर्जा काय? आणि तिच्या खरेदी-विक्रीसाठी कोणत्या प्रक्रिया आवश्यक आहेत? याबद्दलची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत....
News18
News18
advertisement

इतिहास आणि मूळ उद्देश काय होता?

ब्रिटिश काळात, सरकारसाठी विविध कामे करणाऱ्या व्यक्तींना वेतनाऐवजी काही जमिनी वंशपरंपरागत कसण्यासाठी देण्यात येत असत. या जमिनींना “महार वतन जमीन” असे म्हटले जाई. त्या काळी या जमिनींचा उद्देश सेवा करणाऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देणे हा होता.

कायदेशीर बदल काय झाले?

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या वतन पद्धतीत मोठे बदल करण्यात आले. १९५८ मध्ये “मुंबई कनिष्ठ गाव वतन निर्मूलन कायदा” (Bombay Inferior Village Watans Abolition Act, 1958) लागू करण्यात आला. या कायद्यानुसार वतन पद्धत रद्दबातल ठरली आणि सर्व वतन जमिनी सरकारच्या ताब्यात गेल्या. त्यानंतर या जमिनींचा वापर व हस्तांतरण करण्यासाठी शासनाची परवानगी आवश्यक ठरली.

advertisement

भोगवटा वर्ग आणि कायदेशीर निर्बंध

सध्या या जमिनी ‘भोगवटा वर्ग २’ (Occupant Class II) मध्ये मोडतात. याचा अर्थ असा की अशा जमिनींचे हस्तांतरण म्हणजेच खरेदी किंवा विक्री जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय करता येत नाही. परवानगी मिळाल्यासच जमीन विकता येते आणि त्यासाठी ठराविक प्रमाणात नजराणा (जमिनीच्या बाजारमूल्याचा ठराविक टक्का) सरकारकडे जमा करावा लागतो.

advertisement

तहसीलदार व जिल्हाधिकारी यांचा संबंध

या प्रकरणात तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. तहसीलदार संबंधित मालमत्तेची प्राथमिक पडताळणी करून अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवतो. जिल्हाधिकारीच शेवटी परवानगी देण्याचा किंवा नाकारण्याचा निर्णय घेतात. त्यामुळे या जमिनींच्या व्यवहारात प्रशासनाचा हस्तक्षेप आवश्यक ठरतो.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आजारपणात तोंडाला येईल चव, चटपटीत बनवा तांदळाची उकड, रेसिपी एकदम सोपी Video
सर्व पहा

थोडक्यात सांगायचे झाल्यास, महार वतनातील जमीन ही सामान्य शेतीजमिनीप्रमाणे विकता येत नाही. ती विशेष कायदेशीर तरतुदींनुसार नियंत्रित असते आणि तिच्या खरेदी-विक्रीसाठी जिल्हाधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. अन्यथा असा व्यवहार बेकायदेशीर ठरू शकतो.

advertisement

मराठी बातम्या/कृषी/
महार वतन जमीन म्हणजे काय रे भाऊ! या जमिनीची खरेदी-विक्री करता येते का? कायदा काय सांगतो?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल