Tandalachi ukad : आजारपणात तोंडाला येईल चव, चटपटीत बनवा तांदळाची उकड, रेसिपी एकदम सोपी Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
आजारी असल्याने बाहेरील पदार्थ खाऊ शकत नाही. अशावेळी तुम्ही तांदळाची उकड बनवू शकता. अगदी चटपटीत आणि चविष्ट अशी ही उकड तयार होते.
अमरावती : हिवाळा सुरू झाला की, सर्दी, खोकला, ताप यांसारख्या समस्या सुरू होतात. यामुळे दररोज तयार होणारं घरचं जेवण चविष्ट लागत नाही. काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा होते. पण, आजारी असल्याने बाहेरील पदार्थ खाऊ शकत नाही. अशावेळी तुम्ही तांदळाची उकड बनवू शकता. अगदी चटपटीत आणि चविष्ट अशी ही उकड तयार होते. तसेच कमीत कमी साहित्यात देखील बनवू शकता. चविष्ट अशी तांदळाची उकड कशी बनवायची? त्याची रेसिपी जाणून घेऊया.
तांदळाची उकड बनवण्यासाठी लागणारे साहित्य
1 वाटी तांदळाचे पीठ, 1 कप ताक, तेल, जिरे, मोहरी, हिरवी मिरची, कोथिंबीर, हळद, मीठ आणि कढीपत्ता, दोन कप पाणी हे साहित्य लागेल.
तांदळाची उकड बनवण्याची कृती
सर्वात आधी कढईत तेल टाकून घ्यायचे आहे. तेल थोडे गरम झाले की जिरे आणि मोहरी टाकून घ्यायची आहे. जिरे आणि मोहरी तडतडली की, लगेच हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे. त्यानंतर मीठ आणि हळद टाकायची आहे. हे व्यवस्थित मिक्स करून झाले की, त्यात कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. कढीपत्ता भाजून झाला की, त्यात ताक टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर 2 कप पाणी सुद्धा टाकून घ्यायचे आहे. उकड तुम्ही पूर्ण ताक वापरून सुद्धा बनवू शकता. पण, ताक जास्त आंबट असेल तर 1 वाटीसाठी 1 कप ताक आणि 2 कप पाणी असे प्रमाण ठेवू शकता.
advertisement
नंतर पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे. उकळी आल्यानंतर त्यात तांदळाचे पीठ टाकून घ्यायचे आहे. पिठाचे गोळे न होऊ देता हे लगेच मिक्स करून घ्यायचे आहे. मिक्स करून झाल्यानंतर 10 मिनिटे उकड शिजवून घ्यायची आहे. नंतर त्यात कोथिंबीर टाकून ही उकड तुम्ही खाऊ शकता. आजारी व्यक्तीच्या तोंडाला देखील चव येईल अशी ही उकड तयार होते. कमीत कमी साहित्यात चटपटीत आणि टेस्टी उकड तुम्ही नक्की बनवून बघा.
view commentsLocation :
Amravati,Maharashtra
First Published :
November 07, 2025 6:29 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
Tandalachi ukad : आजारपणात तोंडाला येईल चव, चटपटीत बनवा तांदळाची उकड, रेसिपी एकदम सोपी Video

