TRENDING:

हळदीच्या दरात मोठी उलथापालथ, आले आणि डाळिंबाला काय मिळाला आज भाव? Video

Last Updated:

बुधवार, दिनांक 4 फेब्रुवारी 2026 रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: बुधवार, दिनांक 4 फेब्रुवारी 2026 रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ. आज आपण महत्त्वाच्या तीन शेतमालांमध्ये आले, हळद आणि डाळिंबाची आवक व भाव पाहू.
advertisement

आल्याच्या आवकेत सुधारणा

राज्याच्या मार्केटमध्ये आज एकूण 1418 क्विंटल आल्याची आवक झाली. यापैकी नागपूर मार्केटमध्ये सर्वाधिक 729 क्विंटल आल्याची आवक झाली. त्यास प्रतीनुसार 3953 ते 7020 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वाधिक बाजारभाव मिळाला. तसेच जळगाव मार्केटमध्ये आवक झालेल्या 50 क्विंटल आल्यास 3500 रुपये सर्वात कमी बाजारभाव मिळाला.

प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, हडपसर–दिवेघाट मार्ग 3 तास वाहतुकीसाठी राहणार बंद, कारण काय?

advertisement

हळदीला दराची झळाळी

राज्याच्या मार्केटमध्ये आज 2580 क्विंटल हळदीची आवक झाली. यापैकी 1469 क्विंटल राजापूरी हळदीची सर्वाधिक आवक सांगली मार्केटमध्ये राहिली. त्यास प्रतीनुसार 12150 ते 20150 रुपये दरम्यान बाजारभाव मिळाला. तसेच मुंबई मार्केटमध्ये आवक झालेल्या 61 क्विंटल हळदीस 18500 ते 23000 रुपये दरम्यान उच्चांकी बाजारभाव मिळाला.

डाळिंबाच्या दरात चढ-उतार

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, सोयाबीनच्या दरात मोठी वाढ, तुरीला काय मिळाला भाव?
सर्व पहा

आज राज्याच्या मार्केटमध्ये 1214 क्विंटल डाळिंबाची एकूण आवक झाली. यापैकी मुंबई मार्केटमध्ये 901 क्विंटल सर्वाधिक आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 9000 ते 15000 रुपये दरम्यान दर मिळाला. तसेच नाशिक मार्केटमध्ये आवक झालेल्या 56 क्विंटल डाळिंबास 5000 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वात कमी सर्वसाधारण बाजारभाव मिळाला.

advertisement

मराठी बातम्या/कृषी/
हळदीच्या दरात मोठी उलथापालथ, आले आणि डाळिंबाला काय मिळाला आज भाव? Video
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल