मुंबई : ज्योतिष शास्त्रानुसार, गुरुवार दिनांक 18 सप्टेंबर 2025 हा दिवस अत्यंत खास मानला जात आहे. या दिवशी देवी लक्ष्मीला अर्पण केलेले पूजन विशेष फलदायी मानले जाते. सूर्याच्या संक्रमणामुळे ग्रहांची अनुकूल स्थिती तयार होत असून काही राशींवर त्याचा सकारात्मक परिणाम होणार आहे. यामुळे या दिवशी पाच राशींचे भाग्य उजळणार असून त्यांना धन, मान-सन्मान आणि प्रगतीच्या अनेक संधी मिळतील. चला तर जाणून घेऊया कोणत्या पाच राशींना हा दिवस शुभ ठरणार आहे.
advertisement
वृषभ राशी
वृषभ राशीच्या जातकांसाठी हा दिवस मोठ्या संधी घेऊन येणार आहे. आर्थिक क्षेत्रात तुमची भरभराट होईल. स्थिर मालमत्ता किंवा गुंतवणुकीत चांगला फायदा होण्याची शक्यता आहे. व्यवसायात तुमची प्रतिष्ठा वाढेल तसेच, कामाशी संबंधित प्रवास घडण्याची शक्यता आहे. या प्रवासातून नवीन लोकांशी संपर्क वाढून भविष्यात मोठ्या संधी मिळतील. कौटुंबिक आयुष्यातही समाधान राहील.
मिथुन राशी
मिथुन राशीच्या लोकांसाठी हा दिवस विशेष अनुकूल आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ व सहकाऱ्यांचा तुम्हाला सहकार्य लाभेल. त्यामुळे अडथळे पार करून पुढे जाण्याचा आत्मविश्वास वाढेल. तुमची कामगिरी लक्षवेधी ठरेल आणि लवकरच प्रमोशन किंवा सन्मान मिळण्याची शक्यता आहे. सामाजिक वर्तुळात तुमची प्रतिष्ठा वाढेल. नातेवाईकांशी भेटीगाठींमुळे आनंदाचे वातावरण तयार होईल.
कन्या राशी
कन्या राशीसाठी हा दिवस फार लाभदायी आहे. तुमची नियोजनबद्ध पद्धत तुम्हाला यश मिळवून देईल. पूर्वी अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण होऊन मानसिक समाधान मिळेल. आरोग्य चांगले राहील आणि उर्जेने तुम्ही भरलेले असाल. व्यवहार करताना तुमची समजुतदारी लोकांना प्रभावित करेल. घरातील वातावरण प्रसन्न राहील, ज्यामुळे कौटुंबिक संबंध अधिक दृढ होतील.
मकर राशी
मकर राशीच्या जातकांसाठी हा दिवस मोठा शुभ संकेत घेऊन येतो. व्यवसायात नवी प्रगती होईल आणि नोकरीत वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल. तुम्ही घेतलेल्या प्रयत्नांना योग्य फळ मिळेल. देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहिल्याने आर्थिक स्थितीत सकारात्मक बदल होईल. तुमच्याभोवती सकारात्मक व आनंदी वातावरण निर्माण होईल. कुटुंबीयांबरोबर घालवलेला वेळ तुमच्यासाठी समाधानकारक ठरेल.
मीन राशी
मीन राशीच्या लोकांसाठी हा दिवस आशादायी ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी चांगले निकाल मिळतील. नवीन योजना आखण्यासाठी व त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. तुमच्या मेहनतीला योग्य फळ मिळेल. दिवसाच्या शेवटी एखादी शुभवार्ता मिळून मन प्रसन्न होईल. धार्मिक व सामाजिक कार्यात सहभाग घेऊन आत्मिक समाधान मिळेल.
एकंदरीत, 18 सप्टेंबरचा दिवस या पाच राशींसाठी अत्यंत खास व फलदायी ठरणार आहे. आर्थिक लाभ, सामाजिक प्रतिष्ठा व कौटुंबिक आनंद यांचा संगम या राशींना अनुभवायला मिळणार आहे. ग्रहांच्या अनुकूल स्थितीमुळे सकारात्मक ऊर्जा लाभून नवीन संधींचा मार्ग खुला होईल.
(सदर बातमी फक्त माहिती करिता असून न्यूज 18 मराठी कुठलाही दावा करत नाही)