TRENDING:

आजचा दिवस 5 राशींसाठी असणार गेमचेंजर! प्रेमाची अतिवृष्टी होणार, नवीन संधीसह पैशांचा पाऊस पडणार

Last Updated:

Astrology News : आज दिनांक 19 ऑगस्ट 2025, मंगळवार. वैदिक पंचांगानुसार श्रावण महिन्यातील हा मंगळवार विशेष मानला जातो. ज्योतिषशास्त्रात आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्याचे सांगितले गेले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आज दिनांक 19 ऑगस्ट 2025, मंगळवार. वैदिक पंचांगानुसार श्रावण महिन्यातील हा मंगळवार विशेष मानला जातो. ज्योतिषशास्त्रात आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्याचे सांगितले गेले आहे. कारण आज ग्रहांचा दुर्लभ संयोग घडत असून त्याचा थेट परिणाम सर्व 12 राशींवर होणार आहे. श्रीगणेशाची कृपा लाभल्याने काहींना यश, तर काहींना सावधगिरी बाळगण्याची संधी आज मिळेल. चला तर पाहूया आजचे राशीभविष्य.
astrology news
astrology news
advertisement

मेष

मेष राशीच्या जातकांना आज घरगुती बाबींमध्ये तडजोड करावी लागू शकते. संयम आणि शिस्त ठेवून कामाचे नियोजन केल्यास अडचणी दूर होतील.

वृषभ वृषभ राशीच्या लोकांनी मतभेद झाल्यास समजुतीने तोडगा काढावा. नोकरी वा व्यवसायातील कामाची काळजीपूर्वक तपासणी करणे आज आवश्यक आहे.

मिथुन

मिथुन राशीच्या जातकांनी नवीन गोष्टी करण्याच्या ओढीत चालू काम बिघडणार नाही ना, याचा विचार जरूर करावा. संयम आणि लक्षपूर्वक काम केल्यास लाभ मिळेल.

advertisement

कर्क

कर्क राशीच्या लोकांनी दूरदृष्टीने निर्णय घेतल्यास फायदा होईल. काहींना आज स्वप्नांच्या माध्यमातून महत्त्वाचे संकेत मिळू शकतात.

सिंह

सिंह राशीच्या जातकांनी वास्तव आणि कल्पना यातील फरक समजून घेतल्यास दिवस फलदायी ठरेल. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी विवेक वापरा.

कन्या

कन्या राशीच्या लोकांनी प्रत्येक गोष्टीचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. घरातील मोठ्यांचा सल्ला सुरुवातीला मान्य नसला तरी शेवटी तोच योग्य ठरेल.

advertisement

तूळ

तूळ राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस अध्यात्मिक प्रगतीसाठी लाभदायक ठरू शकतो. कामात अधिकार आणि मान-सन्मान मिळण्याची शक्यता आहे.

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या लोकांनी वाहन चालवताना काळजी घ्यावी. जुने आजार पुन्हा डोके वर काढू शकतात. कोणतीही गोष्ट सहज साध्य होणार नाही, त्यामुळे संयम आवश्यक आहे.

धनु

धनु राशीच्या जातकांना काही ध्येय गाठताना कुटुंबीयांचा विरोध सहन करावा लागू शकतो. मात्र चिकाटी ठेवल्यास यश तुमच्या हातात येईल.

advertisement

मकर

मकर राशीच्या लोकांनी आज राजकारण किंवा नेतृत्व क्षेत्रात संयम ठेवावा. रागावण्याऐवजी समजूतदारपणा दाखवल्यास लोकांचा विश्वास वाढेल.

कुंभ

कुंभ राशीच्या जातकांना अहंकार दुखावल्याने अस्वस्थ वाटू शकते. स्वभावातील लहरीपणामुळे अडचणी येऊ शकतात, त्यामुळे शांत राहण्याचा प्रयत्न करा.

मीन

मीन राशीच्या लोकांनी सकारात्मक विचार ठेवल्यास कोणतीही परिस्थिती तुमच्या आड येणार नाही. उत्साह आणि विश्वास ठेवल्यास यश निश्चित मिळेल.

advertisement

दरम्यान,आजचा दिवस ग्रहयोगामुळे सर्व राशींसाठी वेगवेगळ्या अनुभवांनी भरलेला आहे. काहींना प्रगतीचे मार्ग खुलतील, तर काहींनी संयम आणि सावधगिरी ठेवणे गरजेचे आहे. श्रीगणेशाच्या कृपेने योग्य नियोजन व सकारात्मक विचारांनी यशाची वाट मोकळी होऊ शकते.

(सदर बातमी फक्त माहिती करिता असून न्यूज 18 मराठी कुठलाही दावा करत नाही)

मराठी बातम्या/राशीभविष्य/
आजचा दिवस 5 राशींसाठी असणार गेमचेंजर! प्रेमाची अतिवृष्टी होणार, नवीन संधीसह पैशांचा पाऊस पडणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल