Navratri Shopping: एवढ्या स्वस्तात कुठंच नाहीत! नवरात्रीसाठी दागिने फक्त 30 रुपयांपासून, मुंबईत इथं करा खरेदी, Video

Last Updated:

नवरात्री अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे आणि या उत्सवात गरब्याचा जल्लोष म्हणजे तरुणाईसाठी एक खास आकर्षण असतो.

+
नवरात्रीसाठी

नवरात्रीसाठी भुलेश्वरमध्ये ट्रेंडी ऑक्सिडाईज्ड ज्वेलरीचा खजिना फक्त ३० रुपयांपासून सुरूवात!

मुंबई: नवरात्री अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे आणि या उत्सवात गरब्याचा जल्लोष म्हणजे तरुणाईसाठी एक खास आकर्षण असतो. गरबा खेळताना ट्रेंडी आउटफिटसोबत योग्य ज्वेलरी निवडणं महत्त्वाचं ठरतं आणि याच गोष्टीला लक्षात घेता भुलेश्वरमधील एका खास स्टॉलवर पारंपरिक आणि ट्रेंडी ऑक्सिडाईज्ड ज्वेलरीच्या अनोख्या व्हरायटी उपलब्ध आहेत. याची किंमत 30 रुपयांपासून आहे.
या स्टॉलवर ज्वेलरीच्या असंख्य प्रकारांमध्ये रिंग्स केवळ 30 रुपयांना तर आकर्षक इअररिंग्स 150 रुपयांपासून उपलब्ध आहेत. गरबा लूक पूर्ण करण्यासाठी नोज पिन्स फक्त 30 रुपयांपासून मिळत असून विविध डिझाईन्समध्ये उपलब्ध आहेत. याशिवाय हायलाईट म्हणजे ट्रेंडी ऑक्सिडाईज्ड नेकलेसेस ज्यांची किंमत 100 ते 400 रुपयांपर्यंत आहे.
advertisement
या नेकलेसेसमध्ये आधुनिकतेचा टच आणि पारंपरिक झलक दोन्ही एकत्र पाहायला मिळते. गरबा डान्ससाठी परिपूर्ण असणारा कंबरपट्टा फक्त 250 रुपयांपासून मिळतो. यात रंग, डिझाईन आणि स्टाइल्सची भरपूर विविधता असून, हा कंबरपट्टा तुमच्या लूकमध्ये एक खास उठाव आणतो. तसेच बँगल्सपासून ते अ‍ॅक्सेसरीजपर्यंत अनेक आकर्षक प्रकार इथे उपलब्ध आहेत जे संपूर्ण लूकला परिपूर्णता देतात.
advertisement
या स्टॉलवरील सर्व ज्वेलरी अत्यंत परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध असून होलसेल आणि रिटेल दोन्ही प्रकारांत खरेदी करता येते. त्यामुळे गरबा प्रेमींनी एकदा तरी या स्टॉलला भेट देणं हे अगदीच आवश्यक आहे.
जर तुम्ही या नवरात्रीत हटके आणि स्टायलिश दिसायचं ठरवलं असेल, तर भुलेश्वरमधील कबुतरखान्याच्या शेजारी असलेला ठाकूर बेंगल हा स्टॉल म्हणजे तुमच्यासाठी एक उत्तम ठिकाण ठरू शकतो. चला तर मग नवरात्रीच्या तयारीला लागा आणि या खास ज्वेलरी स्टॉलला नक्की भेट द्या.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Navratri Shopping: एवढ्या स्वस्तात कुठंच नाहीत! नवरात्रीसाठी दागिने फक्त 30 रुपयांपासून, मुंबईत इथं करा खरेदी, Video
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement