TRENDING:

शनी देवाची कृपा! दसऱ्याच्या दुसऱ्या दिवसापासून या राशींच्या लोकांनी फक्त नोटा मोजायच्या, श्रीमंती येणार

Last Updated:

Shani Gochar 2025 : ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह-नक्षत्रांचे परिवर्तन हा एक नैसर्गिक पण प्रभावी क्रम आहे. प्रत्येक ग्रह ठराविक कालावधीनंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो आणि त्यामुळे मानवी जीवनावर शुभ-अशुभ परिणाम घडतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह-नक्षत्रांचे परिवर्तन हा एक नैसर्गिक पण प्रभावी क्रम आहे. प्रत्येक ग्रह ठराविक कालावधीनंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो आणि त्यामुळे मानवी जीवनावर शुभ-अशुभ परिणाम घडतात. त्यामध्ये चंद्र हा सर्वात वेगवान ग्रह मानला जातो. तो फक्त अडीच दिवस एका राशीत स्थिरावतो आणि नंतर दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. या बदलाच्या काळात चंद्र इतर ग्रहांसोबत युती करताना काही राशींवर सकारात्मक तर काहींवर प्रतिकूल परिणाम घडवतो.
Astrology News
Astrology News
advertisement

पंचांगानुसार, ३ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजून २७ मिनिटांनी चंद्र कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. दसऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी होणारे हे परिवर्तन काही राशींच्या व्यक्तींना भाग्यवान ठरणार असून त्यांच्या जीवनात नवीन संधी, प्रगती आणि सुखसमृद्धीचे द्वार उघडणार आहे.

चंद्राच्या कुंभ राशीतील प्रवेशाचे शुभ परिणाम

कर्क राशी

कर्क राशीच्या व्यक्तींना चंद्राचा हा गोचर अत्यंत अनुकूल ठरेल. या काळात मनातील अनेक अपूर्ण इच्छा पूर्ण होतील. नोकरीत अपेक्षित बदल होतील, तर स्पर्धा परीक्षेत यश मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीतून नफा होईल आणि अविवाहितांना लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. मेहनत कायम ठेवल्यास प्रगती निश्चित आहे.

advertisement

कुंभ राशी

कुंभ राशीच्या जातकांसाठी हा काळ विशेष लाभदायी ठरणार आहे. आत्मविश्वास वाढेल, समाजात प्रतिष्ठा आणि मान मिळेल. कुटुंबात शुभकार्य घडतील. आर्थिक स्थैर्य लाभेल, तसेच आरोग्यात सुधारणा होईल. परदेशगमनाचे योग जुळतील आणि वैवाहिक जीवनात आनंद नांदेल. मानसिक तणाव कमी होऊन जीवनात स्थिरता येईल.

मिथुन राशी

मिथुन राशीच्या व्यक्तींनाही चंद्राचे हे परिवर्तन अनुकूल असेल. आर्थिक समस्या सुटतील, अडकलेली कामे मार्गी लागतील. आत्मविश्वास वाढेल आणि नवीन नोकरी किंवा पदोन्नतीची संधी मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, तसेच प्रवासाचे योग आहेत. समृद्धी आणि यश तुमच्या जीवनात वाढेल.

advertisement

३ ऑक्टोबर रोजी चंद्राचा कुंभ राशीतील प्रवेश हा कर्क, कुंभ आणि मिथुन राशीच्या व्यक्तींना अत्यंत सकारात्मक ठरणार आहे. करिअर, अर्थकारण, कौटुंबिक जीवन आणि आरोग्य या सर्वच क्षेत्रात सकारात्मक घडामोडी होण्याची शक्यता आहे. ग्रहांची ही हालचाल ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असून, या राशींतील व्यक्तींनी हा काळ संधी साधण्यासाठी उपयोगात आणावा

मराठी बातम्या/राशीभविष्य/
शनी देवाची कृपा! दसऱ्याच्या दुसऱ्या दिवसापासून या राशींच्या लोकांनी फक्त नोटा मोजायच्या, श्रीमंती येणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल