मुंबई : वैदिक पंचांगानुसार, आज दिनांक 20 सप्टेंबर 2025, शनिवार हा दिवस विशेष मानला जात आहे. ज्योतिषशास्त्रानुसार आजच्या ग्रहस्थितीमध्ये एक दुर्लभ योग निर्माण होत आहे. या योगामुळे सर्व राशींवर वेगवेगळ्या प्रकारचा प्रभाव पडणार असून, अनेकांसाठी हा दिवस सकारात्मकता घेऊन आला आहे. शनिदेवांच्या कृपेने हा दिवस काही राशींना यश, तर काहींना सावधानतेचा संदेश देणारा आहे. चला जाणून घेऊया, आजचे 12 राशींचे राशी भविष्य
advertisement
मेष
आज तुमच्या कार्यामुळे नाव लौकिक मिळेल, मात्र निर्णय घेताना सावधानता बाळगावी. बेफिकीरपणा किंवा घाई केल्यास टीका किंवा बदनामी होऊ शकते.
वृषभ
कुटुंबामध्ये महिलांचे मत महत्त्वाचे ठरेल. पूर्वी केलेले प्रयत्न आज फळाला येतील. आर्थिक दृष्ट्या दिवस लाभदायक आहे.
मिथुन
आज तुमच्या व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल जाणवतील. संवादकौशल्य आणि नम्रता तुम्हाला यश मिळवून देतील. लोकांवर चांगला प्रभाव पडेल.
कर्क
जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. आर्थिक क्षेत्रात केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. वैयक्तिक आयुष्यात आनंद आणि समाधान लाभेल.
सिंह
आज शेजाऱ्यांशी संबंध टिकवण्यासाठी तुम्हाला अधिक संयम आणि त्याग करावा लागेल. कौटुंबिक विषयांमध्ये तुमची मध्यस्थी आवश्यक ठरेल.
कन्या
विचारांमधील गोंधळ तुमच्या वागण्यात दिसेल. त्यामुळे इतर लोक संभ्रमित होतील. महत्त्वाच्या निर्णयांमध्ये घाई न करता सल्ला घ्यावा.
तूळ
आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मध्यस्थींचा आधार घ्यावा लागेल. व्यवहारात काळजी घेणे आवश्यक आहे. उत्पन्नाच्या नवीन संधी निर्माण होण्याची शक्यता आहे.
वृश्चिक
जोडीदाराशी छोट्या गैरसमजामुळे मतभेद होऊ शकतात. व्यवसायात पार्टनरच्या विचारांशी सहमती न झाल्यास तणाव वाढू शकतो. शांत राहून निर्णय घ्यावा.
धनु
परिस्थितीनुसार नवीन विचार स्वीकाराल. बदलांना लवकर आत्मसात केल्यास यश मिळेल. शिकण्याची आणि पुढे जाण्याची संधी आज लाभेल.
मकर
काम करण्याची पद्धत बदलाल. व्यावसायिक क्षेत्रात गोड बोलण्यामुळे अनेकांचे सहकार्य मिळेल. नवीन संपर्क उपयुक्त ठरतील.
कुंभ
आज ग्रहांची साथ मानसिक बळ वाढवेल. आत्मचिंतनातून उत्तम कल्पना सुचतील. नवीन प्रकल्प किंवा कामामध्ये यशाची शक्यता आहे.
मीन
कर्तृत्व फुलून येईल. सूचक स्वप्ने तुमच्या भविष्यातील योजनांना दिशा देतील. दुसऱ्यांना सहकार्य करण्यामुळे आदर आणि सन्मान लाभेल.
(सदर बातमी फक्त माहितीकरिता असून न्यूज 18 मराठी कुठलाही दावा करत नाही)