शनि-सूर्य योग देणार भरभराट
फेब्रुवारी महिन्यात शनि आणि सूर्याची स्थिती काही राशींसाठी अत्यंत अनुकूल राहणार आहे. न्याय, शिस्त आणि परिश्रमाचे प्रतीक असलेला शनि तसेच आत्मविश्वास आणि नेतृत्व दर्शवणारा सूर्य या दोघांच्या शुभ संयोगामुळे रखडलेली कामे मार्गी लागतील. करिअर, व्यवसाय, आर्थिक स्थिती आणि सामाजिक प्रतिष्ठा या सर्व बाबींमध्ये सकारात्मक बदल अनुभवायला मिळू शकतात. दीर्घकाळ प्रतीक्षेत असलेले प्रकल्प, नोकरीच्या संधी किंवा आर्थिक लाभ या महिन्यात प्रत्यक्षात येण्याची शक्यता आहे.
advertisement
मेष राशी
मेष राशीच्या व्यक्तींना फेब्रुवारी २०२६ दिलासा देणारा ठरेल. उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील. पूर्वी अडलेले पैसे किंवा थकीत देणी परत मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना जबाबदारी वाढण्यासोबतच पदोन्नती किंवा मान-सन्मान मिळू शकतो. व्यवसायात असलेल्यांना नफ्यात वाढ जाणवेल. बचत वाढवण्याची संधी मिळेल आणि आर्थिक स्थैर्य मजबूत होईल.
मिथुन राशी
मिथुन राशींसाठी फेब्रुवारी हा बदल घडवणारा महिना ठरणार आहे. उत्पन्नात लक्षणीय वाढ होण्याचे संकेत आहेत. भागीदारीत केलेल्या कामातून फायदा होईल. परदेशाशी संबंधित व्यवसाय, नोकरी किंवा व्यवहारातून चांगला लाभ मिळू शकतो. काहींना मनासारखी नोकरी मिळण्याची संधी मिळेल, तर काहींना अपेक्षित बातम्या कानावर पडतील, ज्यामुळे आत्मविश्वास वाढेल.
तूळ राशी
तूळ राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिना आर्थिकदृष्ट्या समाधानकारक ठरणार आहे. घर, जमीन किंवा स्थावर मालमत्तेशी संबंधित व्यवहार यशस्वी होऊ शकतात. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणूक करणाऱ्यांना विशेषतः शेअर बाजारातून चांगला परतावा मिळू शकतो. खर्चावर नियंत्रण राहील आणि बचतीकडे अधिक लक्ष देता येईल.
कुंभ राशी
कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी फेब्रुवारी आत्मविश्वास वाढवणारा ठरेल. महत्त्वाचे निर्णय घेण्याची क्षमता वाढेल. कामाच्या ठिकाणी तसेच समाजात मान-सन्मान आणि प्रतिष्ठा मिळेल. अचानक आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. नव्या गुंतवणुकीच्या संधी समोर येऊ शकतात आणि भविष्यासाठी ठोस आर्थिक नियोजन करता येईल.
(सदर बातमी फक्त माहितीकरिता असून न्यूज १८ मराठी कुठलाही दावा करत नाही)
